प्रसाद लक्ष्मण गायकवाड यांचा कौतुकास्पद उपक्रम
पनवेल / रिपोर्टर
पनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद लक्ष्मण गायकवाड यांनी नुकताच आपल्या चिरंजीवाचा जन्मदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा केला. मानव चिल्ड्रन्स होम या संस्थेतील अनाथ मुलांना फळे वाटप करून आणि जीवनावश्यक जिन्नस प्रदान करून त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला.
ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागत असतो. समाजात नेहमी आपल्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या घटकांना हातभार लावला पाहिजे, अशा उदात्त विचारांनी प्रेरित असणारे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद लक्ष्मण गायकवाड यांचे चिरंजीव वेदांत याचा नुकताच सोळावा जन्मदिवस पार पडला. जन्मदिवसाच्या हिडीस पार्ट्या न करता आपल्या जन्मदिवशी समाजातील गरजू घटकांना काहीतरी द्यावे या उद्देशाने त्यांनी पनवेल येथील साद फाउंडेशनच्या मानव चिल्ड्रन्स होम मधील अनाथ बालकांना फळांचे वाटप केले तसेच त्यांच्या नित्याच्या भोजनासाठी लागणाऱ्या किरणा सामानातील वस्तू भेट म्हणून दिल्या. त्यांच्या या उपक्रमाबद्दल समाजातील सर्वच स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Be First to Comment