Press "Enter" to skip to content

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे – आमदार प्रशांत ठाकूर 


पनवेल /प्रतिनिधी.

स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभा निवडणुकीत अर्थात प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे आणि त्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे, अशा रीतीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतेच केले. 

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मार्केट यार्ड येथे ‘मेरी माटी मेरा देश’, सेवा पंधरवडा, पदवीधर मतदार नोंदणी आणि सरल अँप या विषयांच्या अनुषंगाने पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी विविध योजना अंमलात आणून देशाला प्रगतीपथावर आणले आहे, असे सांगतानाच पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे ती पार पाडावी असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. तसेच सेवा पंधरवडा, मेरी माटी मेरा देश, पदवीधर मतदार नोंदणी व सरल अँप अशा विषयासंदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 

           यावेळी ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार निरंजन डावखरे यांनी पदवीधर मतदार नोंदणी संदर्भात तर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी सरल अँप आणि संघटनात्मक जबाबदारी या विषयी मार्गदर्शन केले. जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी मेरी माटी मेरा देश अभियान नियोजनासंदर्भात तर जिल्हा सरचिटणीस ऍड प्रकाश बिनेदार यांनी सेवा पंधरवडा विषयी माहिती दिली. 

            या बैठकीस जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जयंत पगडे, रामदास ठोंबरे, निळकंठ घरत, विठ्ठल मोरे, डॉ. कविता चौतमोल, प्रिया मुकादम, सुभाष कदम, सनी यादव, चिटणीस चंद्रकांत घरत, ज्ञानेश्वर घरत, रमेश मुंडे, ब्रिजेश पटेल, विद्या तामखडे, किर्ती नवघरे, प्रदीप देशमुख, कोषाध्यक्ष अभिलाषा ठाकूर, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत, खोपोली रमेश रेटरेकर, खालापूर प्रवीण मोरे, उरण रवी भोईर, कामोठे रवींद्र जोशी, कळंबोली रविनाथ पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू शिद,  फ्रेंडस् ऑफ बीजेपी संयोजक नितीन कांदळगावकर, आध्यात्मिक समन्वय आघाडी संयोजक काशिनाथ पारठे, सोशल मीडिया सेल संयोजक गायत्री परांजपे, आयटी सेल नितेश सोळंकी, भटके-विमुक्त आघाडी संयोजक बबन बारगजे, सांस्कृतिक सेल संयोजक अभिषेक पटवर्धन, ट्रान्सपोर्ट सेल संयोजक सुधीर घरत, प्रज्ञा सेल संयोजक गीता चौधरी, आयुष्यमान भारत सेल संयोजक ज्योती देशमाने, बेटी बचाव बेटी पढाव संयोजक आरती तायडे, व्यापार आघाडी संयोजक कमल कोठारी, उत्तर भारतीय सेल संयोजक संतोष शर्मा, एनजीओ संपर्क आघाडीचे  मंदार मेहेंदळे, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष के.सी.पाटील, कायदा सेल अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, क्रीडा प्रकोष्ट संयोजक विनोद नाईक, रेल्वे प्रवासी प्रकोष्ट संयोजक उपेंद्र मराठे, पदवीधर प्रकोष्ट संयोजक राजेश कदम, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.