Press "Enter" to skip to content

एनएमएमसी आयुक्त राजेश नार्वेकर आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते

अपोलो रुग्णालयात ‘द वॉल ऑफ रिमेंबरन्स’ चे अनावरण

नवी मुंबई, ४ ऑगस्ट २०२३: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने ३ ऑगस्ट भारतीय अवयवदान दिनानिमित्त ज्यांनी शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेल्या रुग्णांना नवे जीवन दिले अशा दिवंगत अवयव दात्यांचा सन्मान करण्यासाठी रुग्णालयाने एका अनोख्या ‘द वॉल ऑफ रिमेंबरन्स’ (स्मरण भिंतीचे) अनावरण केले. रुग्णालयाने दिवंगत अवयव दात्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार केला. प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे, सोबत अपोलो हॉस्पिटलचे प्रा.डॅरियस मिर्झा, डॉ.अमोल कुमार पाटील, डॉ.संजीवकुमार जाधव, डॉ किरण शिंगोटे, डॉ रवी शंकर आणि अपोलो पश्चिमी क्षेत्राचे प्रादेशिक सीईओ श्री.संतोष मराठे, दिवंगत अवयवदाते कुटुंबिय आदी मान्यवर उपस्थित होते.

अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिमी क्षेत्राचे प्रादेशिक सीईओ श्री.संतोष मराठे म्हणाले की,“एएचएनएम अतिशय सक्रिय प्रत्यारोपण कार्यक्रम चालवते, ज्यामध्ये यकृत, मूत्रपिंड आणि हृदय प्रत्यारोपणाचा समावेश आहे. आजपर्यंत एएचएनएम ने हाती घेतलेल्या प्रकरणांपैकी २०% प्रकरणे ही मृत अवयव दानाची आहेत. दिवंगत अवयवदात्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निर्माण केलेली ‘द वॉल ऑफ रिमेम्बरन्स’ (स्मरण भिंत) म्हणजे केवळ त्यांच्या दानशूरपणाचा सन्मान नाही तर ही भिंत लोकांना स्वयंप्रेरणेने अवयव दान करण्यास प्रोत्साहित करेल. ही स्मरण भिंत म्हणजे ज्यांच्या मेंदूला गंभीर आणि कधीही बरी न होणारी दुखापत झाली होती आणि ज्यामुळे त्यांचा मेंदू मृत झाला होता, अशा दात्यांच्या कुटुंबीयांच्या धैर्याचा आणि परोपकाराचा हा जणू पुरावाच आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचे अवयव दान करणे हा कुटुंबासाठी अत्यंत कठीण निर्णय असतो. तरीसुद्धा त्यांनी जीवनाची ही अनमोल भेट देऊन उदात्त भावना दाखवली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. एका दात्यामुळे ८ रुग्णांचे प्राण वाचू शकतात. या कारणाला प्रत्येक पावलावर पाठिंबा देत, मला हे जाहीर करताना आनंद आणि अभिमान वाटतो की आमच्या रुग्णालयातील १३७ हून अधिक कर्मचाऱ्यांनी त्यांचे अवयव दान करण्याचे वचन दिले आहे. आम्हाला आशा आहे की या ‘द वॉल ऑफ रिमेंबरन्स’ (स्मरण भिंतीमुळे) व्यक्ती आणि कुटुंबांना मृत्यूनंतर अवयव दान करण्यास प्रेरणा मिळेल आणि अवयव दानाच्या आवश्यकतेबद्दल जागरूकता निर्माण होईल.”

श्री.राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महानगर पालिका म्हणाले,“भारतीय अवयवदान दिनानिमित्त मी अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निस्वार्थ कार्याला प्रणाम करू इच्छितो. यात शंका नाही की या स्मरण भिंतीमुळे भारतात अवयवदानाला प्रचंड चालना मिळेल. अवयवदान ही जीवनाची अनमोल देणगी आहे, निराशेचं मळभ झटकून आशेचे किरण निर्माण करणारी.”

श्री.मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई म्हणाले,“नवी मुंबई पोलीस अवयव प्रत्यारोपण आणि जीवन वाचवण्यासाठी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांना मदत करत आहेत. आम्ही ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात मदत केली आहे जेणेकरून काढलेले अवयव लवकरात लवकर प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचतील आणि आशा आहे की आमच्या प्रयत्नांमुळे प्रत्यारोपण करणाऱ्या शल्यचिकित्सकांना लोकांचे जीव वाचवण्यास मदत झाली आहे आणि रुग्णांच्या कुटुंबीयांच्या मनात आशा जागृत झाली आहे. मला खात्री आहे की या ‘द वॉल ऑफ रिमेंबरन्स’ (स्मरण भिंतीमुळे) लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहन मिळेल.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.