Press "Enter" to skip to content

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या कोकण संवाद बैठकीस अभूतपूर्व प्रतिसाद

अल्पसंख्यांक समाजाची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस एनसीपीचे षडयंत्र ओळखा
– इद्रिस मुलतानी

इद्रिस मुलतानी आणि अविनाश कोळी यांचा करण्यात आला भव्यदिव्य सत्कार

पनवेल / प्रतिनिधी

अल्पसंख्यांक समाजाची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे षडयंत्र ओळखा असे म्हणत विरोधकांनी इंडिया सारखी कितीही गोंडस नावे दिली तरी देखील भारतीयांच्या सेवेसाठी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रधान सेवक म्हणून नरेंद्र मोदीच पहिला पर्याय ठरतील अशी रोखठोक भूमिका भाजपाच्या अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी पनवेल येथे मांडली.ते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात अल्पसंख्यांक मोर्चा कोकण विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा बैठकीला संबोधित करत होते.
         भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश चे नवनिर्वाचित अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्यासह उत्तर रायगड चे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदींचे स्वागत पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये नवनिर्वाचितांचे स्वागत मोठ्या दणक्यात करण्यात आले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास या भूमिकेची गोमटी फळे अल्पसंख्यांक समाज बांधव चाखत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असणारी आढी अल्पसंख्यांक समाज बांधवांच्या मनातून कायमची हद्दपार झालेली आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहत तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक असेल सुवर्णसंधी देऊन मोठे करत आहे.नरेंद्र भाई मोदीजी व देवेंद्र फडणवीस यांचा कार्य प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक सेलचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत.जिल्हा , तालुका, गाव पातळीवर अल्पसंख्याक समाजाला संघटित करून सरकारी योजना मिळवून देण्यासाठी माझे सर्व पक्ष सहकारी तयार आहेत असे प्रतिपादन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ईद्रीस मुलतानी यांनी म्हटले.
         ते पुढे म्हणाले की, निवडणुका आल्या की तीन ते चार महिने अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते येतात आणि आपल्या समाजाला भारतीय जनता पार्टी कसा आपला द्वेष करते असे सांगत दिशाभूल करतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत योग्य काम करणाऱ्या सरकारने अल्पसंख्यांक समाजासाठी तब्बल २८ योजना लागू केल्या आहेत. विकासाची भाषा करणारी भारतीय जनता पार्टी आणि द्वेषाचे राजकारण करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला मूळ फरक समाज बांधवांनी ध्यानात घेतला पाहिजे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आकाशात शांतीचा संदेश देणारी कबुतरे सोडून जनमाणसात सकारात्मक संदेश दिला गेला. सर्व प्रमुख पाहुण्यांना संपूर्ण व्यासपीठ व्यापणारा अतीभव्य पुष्पहार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड प्रभारी सय्यद अकबर, तसेच अल्पसंख्यांक उत्तर विभाग अध्यक्ष जसीम गैस यांच्या शुभहस्ते अर्पण करण्यात आला.
सखोल विश्लेषण अंगिकारत प्रस्ताविकातून व भाषणातून कोकण च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेत सय्यद अकबर यांनी त्यांच्या कल्पक भूमिकेतून ईद्रीस मुलतानी आणि अविनाश कोळी यांचा विशेष सत्कार करत भाजपा मध्येच सर्वसामान्य कार्यकर्त्याना न्याय मिळतो ह्याचे उदाहरण आज सत्कारमूर्ती म्हणून आपल्या समोर आहे असे म्हंटले.त्यावेळी सगळे वातावरण जोरदार घोषणा बाजी करत भाजपमय झाले होते.
         ईद्रीस मुलतानी यांनी भाजपा अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांमध्ये आपल्या समर्पक भाषणाने जोश भरला.अविनाश कोळी यांनी अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. आता भविष्यात अल्पसंख्यांक मोर्चाचे कार्य मंडल व बूथस्तरावर वाढवावे असे त्यांनी आवाहन केले.अतिक खान यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले तसेच इद्रिस भाई यांच्या कार्याची ओझरती झलक उपस्थितांना ऐकविली.संपुर्ण सभागृह प्रचंड उपस्थितीमुळे ओसंडुन जात होते. अल्पसंख्यांक समाजातील महिला आणि युवकांची संख्या लक्षणीय होती आणि विशेषत्वाने सक्रिय असल्याचे जाणवत होते. मेळावा यशस्वी झाल्याचे समाधान सर्व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
         या अभूतपूर्व सोहळ्याला अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सरचिटणीस अतिक खान,मुबंई अध्यक्ष वसीम खान,प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहांगीर, उस्मान खान, मुन्नवर पटेल,मुश्ताक दलवी , इफतेकर अत्तर, मन्सूर पटेल, प्रदेश सचिव मेराज खान,हाजीअकील खान,अर्शद अली, बबलू सय्यद,साबीर शेख, माजी नगरसेवक मुकिद काझी, इम्रान शेख,निसार शेख,अमन अखतर,रिहान तुंगेकर,अकिल वरवंडे , एड.इर्शाद शेख आदी मान्य वर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.