पनवेल प्रतिनिधी
प्रसिद्ध तबलागुरू विनायक प्रधान यांच्या शिष्यगणांचा ‘गुरूवंदना’ हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. पनवेल कल्चरल सेंटरच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला ह. भ. प. नंदकुमार कर्वे, नंदकुमार गोगटे, गायिका मधुरा सोहनी, वाशी गांधर्व विद्यालय चे व्यवस्थापक संदीप वाळके, विनोद तोडेकर, रेवनाथ भाग्यवंत, बिपिन पिसाट, धिरेंद्र ठाकूर, चंद्रकांत मने आदी संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


सुभाष सातारकर यांच्या सनई वादनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्याना धवल कुंटे यांनी तबलासाथ केली. त्यानंतर मिलिन्द गोखले आणि संदिप वीरकर यांचे गायन संपन्न झाले.
यानंतर प्रधान यांच्या शिष्यगणांनी एकल तबलावादन करून आपल्या गुरूंना अभिवादन केले. यामधे ईशा तेंडुलकर, वेदांत पाटील, रिया गावंड, चेतन वडके, ईश्वरी विचारे, सागर घरत, गिरीश भगत, निखिल कडू, संकेत गावंड, जसकिरत सिंग या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
त्याना सौमित्र घाटे आणि विनायक प्रधान यानी लेहरासाथ केली.
विशारद पदवी प्राप्त केलेल्या गिरीश भगत आणि ईश्वरी विचारे यांचा सन्मान करण्यात आला. मुकुंद जोग यांच्या व्हायोलीनवादनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्याना जाई ठाणेकर हिने तबलासाथ केली.



Be First to Comment