Press "Enter" to skip to content

मणिपूर महिला अवमान प्रकरणाचे सर्वत्र तीव्रप्रसाद

मणिपूरमधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात कळंबोलीत काँग्रेसचे धिक्कार आंदोलन

महिलाओं के सन्मान में, काँग्रेस है मैदान मे अशा घोषणा देत पनवेल काँग्रेसचे आंदोलन

पनवेल:
संपूर्ण देशाला हादरवणार्‍या मणिपूरमधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस व पनवेल तालुका काँग्रेसच्यावतीने कळंबोली येथे धिक्कार आंदोलन करण्यात आले. मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढून त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक पाशवी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपासून दंगली सुरू आहेत,. त्यातच २ आदिवासी महिलांवर सामूहिक अत्याचार तथा नग्न करून त्यांची धिंड काढण्याचा घृणास्पद व्हिडिओ समोर आला. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने समाजमन हादरले असून सर्वत्र या घटनेने संताप उसळला आहे. याबाबत काँग्रेस देखील आक्रमक झाली असून सोमवार दिनांक २४ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता के एल टू चौक कळंबोली येथे मणिपूर येथील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटिल म्हणाले, मणिपूर येथे घडलेली घटना समस्त मानवजातील काळिमा फासणारी आहे. तब्बल ७७ दिवसानंतर या घटनेचा व्हीडीओ सोशलमीडियावर समोर आल्यानंतरही मणिपूर राज्य व केंद्रातील भाजप सरकार याविरोधात एकही शब्द काढायला तयार नाही. ज्या देशात महिलांना आपण देवीचे रुप मानतो त्याच महिलांवर अशातऱ्हेने अत्याचार करणाऱ्या समाजकंटकांना फाशीची शिक्षा मिळावी. आणि नैतिकता स्वीकारून केंद्र आणि मणिपूर भाजप सरकारने राजीनामा द्यावा.
याप्रसंगी पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटिल, निरिक्षक चंद्रकला नायडू,जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निर्मला म्हात्रे, माजी नगरसेविका शशिकला सिंह, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, सुदेशना रायते, जयश्री खटकाले, सुधीर मोरे, सुरेश पाटिल, जोस जेम्स, भारती जळगावकर, राकेश जाधव, कांती गंगर, किरण तळेकर, प्रेमा अपाच्या, जयवंत देशमुख, डी एस सेठी, ललिता सोनावणे, योगिता नाईक,लतीफ नलखंडे,चेतन म्हात्रे, गणपत मात्रे, आर येन सिंग, मन पाटिल, भागवत पाटिल, अरुण ठाकूर, संजय विटेकर, अनिल सूर्यवंशी, शीला घोरपडे , नरेश कुमारी नेहमी,सुनिता माली ,आरती पोतदार ,दिपाली ढोले, नीता शेनाय, भावना मॅडम, सुरेश खोसे, यांच्या समवेत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.