गुजरात येथील राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करण्यासाठी खेळाडू सज्ज
पुण्यातल्या बालेवाडी येथे झालेल्या कॅप्टन एझिकल शॉटगन २०२३ या मानाच्या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील सिद्धांत रायफल पिस्तल शुटिंग क्लबच्या शूटर्सने घवघवीत यश प्राप्त केले आहे. दैदीप्यमान यश प्राप्त केलेले हे शूटर्स आगामी काळात गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.ऑल इंडिया शॉटगन शुटिंग चॅम्पियनशिप या शीर्षकाखाली आगस्ट महिन्यात गुजरात मध्ये स्पर्धा संपन्न होणार आहे.
बालेवाडी येथे 20 जुलै ते 22 जुलै या दरम्यान ही स्पर्धा रंगली.पुरुषांच्या डबल ट्रॅप शॉटगन स्पर्धेत गोरेगावच्या मुसा मेहमूद काझी याने सुवर्णपदक पटकावले तर महाड च्या साईम झुबेरखान देशमुख याने कांस्यपदक पटकावले.ज्युनिअर महिला गटामध्ये उरण तालुक्यातील दिघोडे गावची रहिवासी असणारी अवनी अलंकार कोळी हिने सुवर्णपदक पटकावले.
पुरुष गटामध्ये मूसा मेहमूद काझी गोरेगाव रायगड सुवर्णपदक, महाड कांस्यपदक व दिघोडे उरण कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांच्यात रायगडच्या तीन खेळाडूंनी पदके पटकावल्यामुळे रायगड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. राज्य पातळीवर घवघवीत यश संपादन केल्यामुळे गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंचे मनोबल उंचावले असून गुजरात येथे देखील रायगड जिल्ह्याचा दबदबा पाहायला मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
क्लब चे अध्यक्ष विजय खारकर,सेक्रेटरी रायगड भूषण व राष्ट्रीय नेमबाज किसन खारके,प्रीतम पाटील ,समाधान घोपरकर,कोच अलंकार कोळी ,महेश फुलोरे,अंबरनाथ, अजिंक्य चौधरी डोंबिवली ,श्रीरामसर पाटील कल्याण , तसेच अवनी कोळी शिकत असलेल्या इंडियन मॉडेल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधील प्रिन्सिपल गौरी शाह व सर्व स्टाफ ह्यांनी खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल तसेच त्यांच्या गुजरात येथे ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या ऑल इंडिया शॉटगन शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






Be First to Comment