वाढदिवशी निभावले सामाजिक दायित्व !
अलिबाग –
महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस सचिव अॅड. प्रविण ठाकूर स्वतःच्या वाढदिवशी देशाच्या सीमेवर लढणा-या सैनिकांप्रती सामाजिक दायित्व म्हणून दरवर्षी वाढदिवसानिमीत्त सैनिक कल्याण निधीसाठी भरघोस आर्थिक मदत करतात. यावर्षीही त्यांनी एक लाख रूपयाचा धनादेश रायगडच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सुपूर्द केला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी कविता ठाकूर, कन्या अपूर्वा ठाकूर, धनश्री ठाकूर, बंधू उमेश ठाकूर, पुतणे कुबेर ठाकूर, पर्नवी ठाकूर, मित्र आर. डी.पाटील सैनिक कार्यालयातील भास्कर नाटालकर, बळीराम म्हात्रे, लक्ष्मण पाटील, दयाराम घासे ई. उपस्थित होते.
देशाच्या सिमांच्या रक्षणासाठी वादळवारा, पाउस, कडाक्याची थंडी अशा सर्व समस्यांना तोंड देवून कार्यरत असणा-या जवानांप्रति अॅड. प्रविण ठाकूर यांची सैनिकांना सहायता करण्याची ही कृति संपूर्ण तरूण वर्गासाठी नव्हे तर सर्व समाजासाठी मार्गदर्शक असल्याची भावना यावेळी प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी बोलून दाखविली.
सैनिकांच्या कुटुंबियासाठी, अपंग सैनिक, विधवा पत्नी, शहिदांचे आई-वडील व परिवारांसाठी या ध्वजदिन निधीचा उपयोग केला जातो. महाराष्ट्र शासन व सैनिक कल्याण विभाग यांच्यामार्फत या निधीचा विनीयोग होतो.




Be First to Comment