पावसामुळे दरड कोसळून खालापूर येथील इरसाळवाडीतील आपत्तीग्रस्त नागरिकांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केलेले आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सकाळी भेट दिली.रुग्णांची विचारपूस करून त्या स्वतः पुन्हा घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवदास कांबळे
हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.सुधीर कदम साहेब महानगरपालिका अधिकारी आरोग्य अधिकारी डॉ गोसावी आणि डॉ भोईटे साहेब उपस्थित होते. आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी सहाय्य करणार असून त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.





Be First to Comment