Press "Enter" to skip to content


पॉवरलिफ्टींग  रायगडचे अरुण पाटकर यांचा गौरव

मुबई (प्रतिनिधी)
घोडपदेव येथील “गवसे – आल्याची वाडी ग्रामस्थ मंडळ ,मुंबई यांनी रविवार दिनांक १६/०७/२०२३रोजी मुबईकर मंडळींचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी आपल्या “गवसे”(ता.आजरा, जि .कोल्हापूर) गावचे सुपुत्र “अरुण लक्ष्मण पाटकर ” यांना आमंत्रित केले होते.या प्रसंगी सुरेश माडभगत यांनी प्रास्तविक केले.अरुण पाटकर यांनीपॉवरलिफ्टिंग,शरीर सौष्ठव,या विभागंमध्ये केलेल्या क्रीडाकार्याबद्दल
  माहिती दिली. तसेच गेल्या वर्षी “अष्टगंध क्रीडा पुरस्कार२०२२ प्राप्त झाला असल्याचे नमूद केले. तसेच राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत २वेळा उत्कृष्ट पंच म्हणून त्यांना सन्मानित केले होते.
     या कार्याबद्दल आमचे सर्व ग्रामस्थांना अभिमान असल्याचे  संजय डोंगरे,विठ्ठल दत्तात्रय पाटील  यांनी नमूद केले.याच प्रसंगी  महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ ,मुंबई मधून नुकतेच सेवा निवृत्त झालेले बबन ऊर्फ लहू लक्ष्मण पाटील यांचा  महादेव पाटकर  यांचे हस्ते आणि अरुण लक्ष्मण पाटकर यांना संजय  डोंगरे सुरेश माडभगत यांचे हस्ते गौरवण्यात आले.लहू लक्ष्मण पाटील आणि अरुण लक्ष्मण पाटकर या दोघांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले.
     या अरुण पाटकर यांनी हा गौरव समारंभ आयोजित केेल्याबद्दल संजय डोंगरे,संदीप कृष्णा पाटकर,विठ्ठल दत्तात्रय पाटील यांना  धन्यवाद दिले.तसेच  गावातील मुंबईकर तरुणांनी व्यायाम करून स्पर्धा मध्ये भाग घेऊन नावलौकिक मिळवावा असे सांगून त्यासाठी योग्य ते सहकार्य ,मार्गदर्शन करण्याचे मान्य केले.तसेच चांगला खेळाडू तयार व्हावा यासाठी गवसे ग्राम दैवत श्री देव रवळनाथ आणि देवी सातेरी,देव  चाळोबा चरणी प्रार्थना केली
            या वेळी   महादेव लक्ष्मण पाटकर,गौरव पाटील, धोंडीबा पाटकर,सुनील पाटील, चंद्रकांत आर्जुन पाटील, आशिष ज्योतिबा भादवणकर,
सागर माडभगत, शिवम पाटील, सुनील पाटील ,जगदीश भीमराव पाटील, संतोष पेडणेकर आणि विनायक धनाजी हेब्बाळकरआदी मान्यवर हजर होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.