Press "Enter" to skip to content

भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी अविनाश कोळी विराजमान


पनवेल(प्रतिनिधी) 

भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी पनवेलचे अविनाश कोळी यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 

यापूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यांचा या पदाचा कार्यकाळ संपल्याने नवीन जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
             अविनाश कोळी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांवर काम करत, भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नंतर भाजप मंडल चिटणीस, सरचिटणीस, जिल्हा संघटन सरचिटणीस आणि भाजप पक्षाने केलेल्या आवाहनानुसार पूर्णवेळ विस्तारक म्हणून रायगड लोकसभा क्षेत्रात काम केले आहे. संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क या शिदोरीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्यात ते नेहमीच यशस्वी झाले आहेत.  हे पाहता आता पक्षाने उत्तर रायगड जिल्हा भाजपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे.  या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अविनाश कोळी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 

             यापूर्वी उत्तर रायगड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपा अधिकाधिक मजबूत करण्याचे काम झाले आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे अविनाश कोळी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.