Press "Enter" to skip to content

आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वृक्षारोपण संपन्न

विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखणे ही महत्त्वाचे..

अंशुमली श्रीवास्तव यांचे प्रतिपादन.

पनवेल (प्रतिनिधी)

आज केंद्र शासनाच्या “आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वृक्षारोपण”  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) चे अधिकारी  अंशुमली श्रीवास्तव, वाठोरे सर, डॉ.सुरेश कुमार, घोटकर सर, भरत कुमार, पनवेलचे मा.आदर्श नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते. 

   यावेळी बोलताना श्रीवास्तव यांनी सांगितले की, नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते विकासाची कामे करताना जेवढी वृक्षतोड केली जाते त्याच्या दुपटीने वृक्ष लागवड करून सदर रस्त्याचा प्रकल्प पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांचे संगोपन करून निसर्गाचा समतोल राखावा हे उद्दिष्ट नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया ने डोळ्यासमोर ठेवले आहे.

    यावेळी बोलताना अंशुमली श्रीवास्तव यांनी सांगितले की जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आतापर्यंत केलेल्या  रस्त्याच्या कामाची गती पाहता दिलेल्या वेळेत गुणवत्ता राखून हे काम जलद गतीने पूर्ण होईल आणि कोकणवासीयांना लवकरच चांगला रस्ता प्रवासादरम्यान अनुभवास मिळेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.