वृक्षांच्या भागवत पूजनाने करण्यात येते वृक्ष संवर्धन
दृष्टी परिवर्तन झाले की सृष्टी परिवर्तन आपोआप होते या सिद्धांतानुसार सृष्टी गौरवाचा वारसा अखिल स्वाध्याय परिवाराला देणारे परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांचे कार्य वर्णविण्यासाठी कुणाचेही शब्द अपुरे पडतील. पांडुरंग शास्त्री आठवले अर्थात दादा यांच्या प्रेरणेने आणि त्यांची कन्या धनश्री तळवलकर (दिदी)यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी १२ जुलै हा माधववृंद आणि वृक्ष मंदिर दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
सोमवार दिनांक १२ जुलै रोजी अखिल स्वाध्याय परिवाराने लाखो वृक्षांचे रोपण करून त्याचे भागवत पूजन करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा पण केला. तसेच या दिवशी दीदींचा जन्मदिवस असल्याने अखिल स्वाध्याय परिवाराच्यावतीने युवा दिन म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची कल्पना अमलात आणून या ध्येयाकडे आश्वासक गतीने पुढे सरकणारा स्वाध्याय परिवार हा जगातील एक आदर्श असा समूह परिवार आहे. स्वाध्याय परिवाराच्या कार्याची व्याप्ती आणि शिस्तबद्ध कार्याचा आवाका यामुळे वृक्ष मंदिर दिनी लाखो वृक्षांचे रोपण झालेले असून भविष्यात यातील हर एक वृक्ष जगविण्याचा प्रत्येक परिवार सदस्याचा काटेकोर प्रयत्न असेल यात जराही दुमत नाही.




Be First to Comment