निर्धारित वेळेत काम पूर्ण झाल्यामुळे औद्योगिक वसाहतीत जाण्याचा मार्ग झाला सुकर
पनवेल शीळ महामार्गावर फुडलैंड येथून तळोजा औद्योगिक वसाहती मध्ये ये जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता जातो. जेएनपीटी बंदरातून औद्योगिक वसाहतीसाठी ये जा करण्यास हाच रस्ता अत्यंत समर्पक ठरतो. या रस्त्यावरील वर्दळ पाहता येथे असणाऱ्या रेल्वे मर्गिकेवरील उड्डाणपुलावर सिमेंट काँक्रीट चा रस्ता बनविण्याची मागणी तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन ने केली होती. सिडको प्रशासनाने मागणीची दखल घेत काम सुरू केले होते. योग्य वेळेत सदरचे काम पूर्ण झाल्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये ये जा करण्यासाठी निर्धोक मार्गाची निर्मिती झालेली आहे.
उड्डाण पुलाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी या पत्रात म्हटले आहे की, आमच्या मागणीची दखल घेत सिडको प्रशासनाने हे काम हाती घेतले याचे समाधान आहे. जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दोन कोटी ७७ लाख रुपयांचा सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प अत्यंत वेळेत पूर्ण केल्यामुळे आनंद होत आहे.डिसेंबर महिन्यात सुरू झालेले हे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणे अभिप्रेत होते. त्यानुसार सदरचे काम २६ जून रोजी संपूर्ण झाले. अन्य कामे पूर्ण झाल्यानंतर आता हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये अवजड वाहनांची ये जा होत असते. त्यांच्या सुयोग्य वाहतुकीसाठी आणि एकंदरीतच जास्त काळ टिकून राहण्यासाठी सदरचा रस्ता कॉंक्रिटचा हवा अशी मागणी आम्ही केली होती. आमच्या मागणीला सन्मान देऊन सिडको प्रशासनाने हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.





Be First to Comment