Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अदिती ताई तटकरे यांनाच मिळावे अशी जनतेची मागणी

पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी केले प्रतिपादन.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आदिती ताई तटकरे यांनी विराजमान व्हावे अशी जनतेची इच्छा आहे. यापूर्वी मिळालेल्या अडीच वर्षाच्या कालावधीचे त्यांनी अक्षरशः सोने करून दाखविले असल्यामुळे त्यांनीच पालकमंत्री पदी विराजमान व्हावे अशी जनभावना उमटत असल्याचे शिवदास कांबळे म्हणाले.
          याबाबत अधिक सविस्तर बोलताना शिवदास कांबळे म्हणाले की, कोव्हिड काळामध्ये आदिती ताई तटकरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यासाठी अक्षरशः दिवस-रात्र एक केली. देवांश इन हॉटेल, एस सी आय चे साठवणूक गृह अशा खाजगी ठिकाणी देखील कोविड सेंटर उभारून त्यांनी त्यांच्या कणखर नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. खाजगी इस्पितळांमध्ये तसेच शासकीय इस्पितळांमध्ये कोरोना संदर्भात हर तऱ्हेचे इन्फ्रास्ट्रक्चर पुरविण्यासाठी तमाम प्रशासनाला सोबत घेत त्यांनी अक्षरशः रायगड जिल्हा पिंजून काढला होता. रेमिडेसीव्हिर, टॉसीलुझीमॅब इंजेक्शने मिळवून देण्यासाठी देखील त्यांनी शासकीय पातळीवरती यशस्वी मायक्रो मॅनेजमेंट करून दाखवले. दरम्यानच्या कालखंडात झालेल्या सत्तांतरामुळे अनेक महत्त्वकांक्षी अभियान राबविण्याची संधी त्यांच्यापासून नियतीने हिरावली होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सत्तेत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतल्यामुळे योजलेले अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविण्याची संधी पुन्हा एकदा अदिती ताई तटकरे यांच्याकडे चालून आली असल्यामुळे जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते.
           कोरोना संकटाचे ढग दूर जात असतानाच वादळ आणि महापूर ही दोन नैसर्गिक संकटे कोकण किनारपट्टीवर चालून आली. यावेळी पूरग्रस्तांना भरघोस मदत मिळवून देण्यासाठी दिवस रात्र अखंडपणे पूरग्रस्त पुनर्वसन केंद्रात ठाण मांडून आदिती ताई यांनी नियोजन कौशल्याचा अतुलनीय नमुना सादर केला होता. वादळग्रस्तांच्या शेतीचे,बागायतीचे,नारळी फोफळीच्या वाडीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासकीय पातळीवरून मदत मिळवून देण्यात देखील आदिती ताई तटकरे यांचा सिंहाचा वाटा होता. यासोबतच महिला सक्षमीकरणाची कास धरत ताईंनी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील घटकापर्यंत शासकीय योजना आणि शासकीय मदत मिळवून देण्यासाठी त्यांचे कार्यालय अथक पणाने काम करत होते. म्हणूनच पालकमंत्री पदावरती आदिती ताई यांनीच विराजमान व्हावे असा जनतेतून सुर उमटत आहे.
         

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.