Press "Enter" to skip to content

५०० अवयव प्रत्यारोपीत करणारे नवी मुंबईतील ‘अपोलो’ एकमेव रुग्णालय

३२७ मूत्रपिंड प्रत्यारोपण, २०० यकृत प्रत्यारोपण आणि ८ हृदय अपोलोने आतापर्यंत प्रत्यारोपीत केली

नवी मुंबई, ७ जुलै २०२३: अवयव प्रत्यारोपण करण्याच्या प्रक्रियेत वाशीच्या आपोलो हॉस्पिटल्सने नवा इतिहास घडवला आहे. याबाबत प्रसिद्धी माध्यमांना अवगत करताना अपोलो हॉस्पिटलचे पश्चिम अविभागीय मुख्याधिकारी संतोष मराठे म्हणाले की नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील अपोलो इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सप्लांटमधील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक अशा अत्याधुनिक बहु-अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे. २०१७ पासून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने ३२७ मूत्रपिंड प्रत्यारोपण, २०० यकृत प्रत्यारोपण आणि ८ हृदय प्रत्यारोपण केले आहेत.

ते पुढे म्हणाले की,अपोलो हे आरोग्यसेवेमध्ये नेहमीच अग्रगण्य राहिले आहे आणि हे यश म्हणजे जीवनदान देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा जणू पुरावा आहे.आमचे ५३५ प्रत्यारोपण (आंतरराष्ट्रीय स्तरावरील १८ मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि १२ यकृत प्रत्यारोपण) म्हणजे ही केवळ एक संख्या नाही; तर कुटुंबांना पुन्हा एकत्र येण्याचा आनंद आणि रुग्णांना आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळाल्याचे द्योतक आहे. ज्यांचे जीवन प्रत्यारोपणाद्वारे वाचवले गेले किंवा ज्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आली अशा प्रत्येक रुग्णासाठी अपोलोचा प्रत्यारोपण कार्यक्रम जणू आशेचा किरण आहे.”

डॉ. प्रा. डॅरियस मिर्झा, मुख्य सल्लागार-पश्चिमी क्षेत्र, यकृत-एचपीबी प्रोग्राम,अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,”शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपण ही जीवन वाचवणारी प्रक्रिया असून यामुळे जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारते. अपोलोच्या यकृत प्रत्यारोपण विभागाने नेहमी उत्कृष्ट परिणाम देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आमच्या पट्ट्याखाली २०० यकृत प्रत्यारोपण करून, त्यापैकी ६५ मुलांमध्ये करण्यात आल्या आहेत, आम्ही यकृताच्या आजाराशी लढा देण्यासाठी आणि आमच्या रुग्णांना निरोगी आणि अधिक परिपूर्ण जीवनाची संधी देत आहोत.”

डॉ.अमोल कुमार पाटील, यूरोलॉजी,यूरो-ऑन्कोलॉजी, मूत्रपिंड प्रत्यारोपण-रोबोटिक शस्त्रक्रिया वरिष्ठ सल्लागार, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले,”अपोलो येथील आमचा मूत्रपिंड प्रत्यारोपण कार्यक्रम मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा एक आधारस्तंभ ठरला आहे. कल्पकता, समर्पण आणि रुग्णाची अतुलनीय काळजी याद्वारे आम्ही 300 हून अधिक मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. प्रत्येक प्रक्रिया ही नव्या जीवनाचे प्रतीक आहे आणि आमच्या रूग्णांना सकारात्मकपणे जीवन जगण्याची संधी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

डॉ.संजीव जाधव, सीव्हीटीएस, हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया-सल्लागार, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले,”हृदय प्रत्यारोपण ही एक नाजूक वैद्यकीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अचूकता, कौशल्य आणि कारुण्य भाव आवश्यक आहे. अपोलो येथे आम्ही हृदयविकाराच्या रुग्णांना आशा प्रदान करतो आणि नवी सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन देतो. आम्ही करत असलेले प्रत्येक हृदय प्रत्यारोपण हे समर्पित भावनेचा आणि वैद्यकीय उत्कृष्टतेच्या अथक प्रयत्नांचा जणू दाखला आहे”

भारतासारख्या देशात अवयव दानाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे म्हणून अवयव प्रत्यारोपण तसेच विशेषतः मृत दात्यांच्या अवयव प्रत्यारोपणाची खूप आवश्यकता आहे. अपोलोने ५०० प्रत्यारोपणाचा मोठा पल्ला गाठल्यामुळे भारतात दरवर्षी ५००,००० हून अधिक लोकांना अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते तसेच २००,००० लोकांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते आणि सुमारे १५०,००० लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते यावर शिक्कामोर्तब झाले आहे व ही वस्तुथिती देखील समोर आली आहे. परंतु अवयवांच्या कमतरतेमुळे आणि मर्यादित प्रत्यारोपण सेवांमुळे केवळ ५% लोकांपर्यंत पोहोचता येते आणि हजारो लोक जीवनरक्षक प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करत आपला जीव गमावतात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.