दैनिक पुढारी च्या वतीने दैनिक पुढारी – पनवेल ,नवी मुंबई सन्मान पुरस्कार सोहळा – 2023
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह , पनवेल इथे रविवार , दिनांक 18 जून रोजी मोठ्या उत्साहात आणि दणक्यात पार पडला .
या कार्यक्रमात पनवेल ,नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात केलेल्या अनन्यसाधारण कामगिरीमुळे व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय
योगदानाबद्दल आणि समाजात शैक्षणिक कामगिरीचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविल्याची दखल घेत ठकेकर क्लासेस चे संचालक अनिल ठकेकर सर यांना महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री उदय सामंत आणि पनवेल विधानसभा आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या हस्ते दैनिक पुढारी – पनवेल ,नवी मुंबई सन्मान 2023 हा मानाचा पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख , रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर ,पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शेकाप नेते जे . एम . म्हात्रे यांच्या समवेत अन्य मान्यवर उपस्थित होते .
सदर मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ठकेकर क्लासेस चे संस्थापक अनिल ठकेकर सर यांच्यावर समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे .





Be First to Comment