Press "Enter" to skip to content

हेतूपुरस्सरपणे फॅसिलिटीज कुलूप बंद करणाऱ्या मॅनेजमेंट विरोधात रहिवासी झाले आक्रमक


इंडियाबुल्स मधल्या रहिवाशांनी केले आंदोलन

https://we.tl/t-yh6DTgLEUn?utm_campaign=TRN_TDL_05&utm_source=sendgrid&utm_medium=email&trk=TRN_TDL_05

पनवेल प्रतिनिधी

       पनवेल नजिक पुणे- मुंबई जुन्या महामार्गावरील कोन फाटा येथे असणाऱ्या इंडियाबुल्स या आलिशान निवासी संकुलामधील रहिवाशांनी रविवार दिनांक १४ मे रोजी भर उन्हात आंदोलन छेडले. आलिशान सुविधांच्या आश्वासनांची खैरात करून टोलेजंग इमारतीमध्ये घरे विकणाऱ्या बिल्डर लॉबीचे खरे स्वरूप या आंदोलनाच्या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहे.३१ जानेवारी पासून इंडियाबुल्स मॅनेजमेंटने जिम्नॅशियम, इनडोअर क्लब,स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन- लॉन टेनिस कोर्ट कुलूप बंद केले होते. अनेक विनंती विनवण्या अर्ज केल्यानंतर देखील मॅनेजमेंट कुठल्याही प्रकारे सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते. अखेरीस इंडियाबुल्स रहिवाशी संघर्ष समितीला आंदोलनाचे संविधानिक हत्यार उपसावे लागले. इंडियाबुल्स मॅनेजमेंटच्या प्रतिनिधीने आंदोलन स्थळी येऊन तातडीने उपरोक्त पाचही ठिकाणची कुलपे उघडून दिली. असे असले तरी देखील गेले चार महिने बंद अवस्थेमधील स्विमिंग पूल पुन्हा सुरू करण्यासाठी मॅनेजमेंट ला किमान एक ते दीड महिना लागणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये स्विमिंग पूल चा आस्वाद न घेता आल्याने रहिवाशांच्या मधून तीव्र खेद व्यक्त केला जात आहे. एकंदरीतच या आंदोलनाला संमिश्र यश आले असले तरी देखील येथील रहिवासी मिळणाऱ्या सुविधांच्या बाबतीत असमाधानी आहेत.इंडिया बुल्स मध्ये एकूण ३२०० सदनिका धारक आहेत.२७ बहुमजली टॉवर मध्ये या सदनिका आहेत.
         झपाट्याने विकसित होणाऱ्या मुंबई ठाणे नवी मुंबई सारख्या शहराच्या कोलाहलापासून दूर निसर्गरम्य वातावरणात रहायला मिळावे अशी प्रत्येक सामान्य नागरिकाची भावना असते. नागरिकांच्या याच दुखत्या नसेवर बोट ठेवत मोठमोठे बिल्डर्स पनवेल परिसरातील ग्रामीण विभागांमध्ये आलिशान टोलेजंग निवासी संकुल उभारत आहेत. कोन नजीक असणारे इंडियाबुल्स हे निवासी संकुल यांच्यापैकीच एक. या संकुलामध्ये पाच विविध सोसायट्या आहेत यातील सेक्टर १ ची सोसायटी वगळता बाकीच्या चार सोसायट्यांची निर्मिती झालेली असून ती नोंदणीकृत झालेली आहे. यादरम्यान इंडियाबुल्स मॅनेजमेंटच्या वतीने जिम्नॅशियम, इनडोअर क्लब,स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन- लॉन टेनिस कोर्ट या सुविधा गेली दोन वर्षे पुरविल्या जात होत्या. सोसायट्यांची निर्मिती झाल्यानंतर सर्व सोयी सुविधा सोसायटी यांच्याकडे हस्तांतरित करणे कर्मप्राप्त असते. हस्तांतरणाच्या याच प्रक्रियेत इंडिया बुल्स मॅनेजमेंट टीम आणि सोसायटी यांच्यात विसंगती असल्याचा फटका रहिवाशांना बसत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर दिसत असल्याचे आंदोलन करणाऱ्या रहिवाशांचे म्हणणे आहे.
       इंडियाबुल्स संकुलामध्ये घरे घेणाऱ्या रहिवाशांना वर्ल्ड क्लास स्कूल, हॉस्पिटल, क्लब हाऊस, शॉपिंग मॉल अशा पंचतारांकित सुविधांची आश्वासने देखील देण्यात आलेली आहेत. परंतु या सुविधा देणे दूरच राहिले,साधे पिण्याचे मुबलक पाणी देण्यात सुद्धा इंडियाबुल्स मॅनेजमेंट अपयशी ठरत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. रविवारी झालेल्या आंदोलनामध्ये संघर्ष समितीच्या वतीने राहुल सोनावणे, दिनेश सोनवणे, वैभव आहेर, लव्हेंडर सोसायटीचे खजिनदार मालवणकर, मिश्राजी, अनुजा ज्ञाने, प्रेम लता सिंग, हेमा दलियन, गोपीकृष्ण, अनिरुद्ध रीशी मनोज यादव आदी प्रमुख मान्यवरांसह सोसायटीतील रहिवाशी त्यांची मुले, अप्तेष्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
    

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.