

माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांच्या पनवेल मधील जनसेवा कार्यालयाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते बुधवार दिनांक ३ मे रोजी उद्घाटन संपन्न झाले. पनवेलच्या महात्मा गांधी मार्गावर विकसित केलेल्या शानदार कार्यालयाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील सदिच्छा भेट दिली.

अत्यंत खडतर परिस्थितीत संघर्ष करून स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या निलेश पाटील यांचे यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मुक्तकंठाने कौतुक केले तसेच यशस्वी वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले. यावेळी निलेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा जेष्ठ नेते वाय टी देशमुख,माजी नगरसेवक अनिल भगत, भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस नितीनभाई पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, मुकीद काझी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, पनवेल शहर भाजपाचे सरचिटणीस अमरीश मोकल,सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे, पत्रकार विक्रम बाबर,उद्योजक इकबाल काझी, भाजपा रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेल चे सदस्य शावेझ रिझवी, प्रशांत कर्पे, श्रीकृष्णदेव साळुंखे,विवेक गावंड, प्रविण भोसले,किशोर बाबरे आदी मान्यवरांच्या सह निलेश पाटील यांचा मित्र वर्ग, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Be First to Comment