पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सन्माननीय सदस्य तथा सुप्रसिद्ध निवेदक प्रवीण मोहोकर यांचे वडील हिरामण राघो मोहोकर यांचे बुधवार दिनांक ३ मे रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. हिरामण मोहोकर यांचे मृत्यू समयी वय ७७ वर्षे होते. पनवेल मधील कोळीवाडा स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिरामण मोहोकर यांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचे उद्देशाने अगदी वयाच्या चौदाव्या वर्षी टपाल नाका येथे चप्पल विक्री व्यवसाय सुरू केला. सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या नेटाने पार पाडणाऱ्या हिरामण मोहोकर यांनी जवळपास पाच दशके चप्पल विक्री व्यवसाय यशस्वीपणे केला. त्यांच्या पश्चात एक मुलगा पाच मुली,सुनबाई,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

१२ मे रोजी उद्धर रामेश्वर पाली येथे दशक्रिया विधी होणार असून १५ मे रोजी तेराव्याचे उत्तर कार्य विधी पनवेलच्या रोहिदास वाडा येथील राहत्या घरी होणार आहेत. त्यांच्या अंतिम यात्रेमध्ये समाजाच्या सर्वच थरांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुःखद समयी सावरण्याचे बळ ईश्वर मोहोकर कुटुंबीयांस प्रदान करो. हिरामण राघो मोहोकर यांच्या मृतात्म्यास सद्गती प्राप्त होवो ही सिटीबेल वृत्त समूहाच्या वतीने प्रार्थना.





Be First to Comment