Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवृत्ती निर्णयावर सतीश पाटील यांची प्रतिक्रीया


ज्या मंदिरात माझा विठ्ठलच नाही तेथे मी भक्ती कशी करू?
मा. नगरसेवक सतिश पाटील

         लोक माझा सांगाती या आत्मवृत्ताच्या दुसऱ्या आवृत्ती प्रकाशनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सर्व शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला. अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले. मुंबई राष्ट्रवादी कार्यालयासमोर ठेवण्यात येतो राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. अखेरीस पवार साहेबांची बैठक करून त्यांचा निरोप घेऊन आलेल्या अजितदादांनी सगळ्यांचे समजूत काढली. पवार साहेबांच्या राजीनामे आला प्रतिसाद म्हणून राज्यभरातून राजीनामा सत्र सुरू झाले. अखेरीस राजीनामा सत्र थांबवा अशी पवार साहेबांना विनंती करावी लागली.
          शरद पवार साहेबांनी कार्यकर्त्यांकडे दोन ते तीन दिवसांचा अवधी मागितला आहे. या अवधीमध्ये त्यांच्या निर्णयावर ते फेरविचार करण्याची शक्यता आहे. असे असले तरी देखील पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी मात्र त्यांचा राजीनामा जयंत पाटील यांच्याकडे पाठवून दिलेला असून, ज्या मंदिरात माझा विठ्ठलच नाही तेथे मी भक्ती करून काय उपयोग असा आर्त सवाल उपस्थित केला आहे? ते पुढे म्हणाले की ज्यांचं बोट धरून समाजकारण करायला शिकलो ते आधारवड,गुरुवर्य जर मला मार्गदर्शन करणार नसतील तर त्या मार्गावर मी न चाललेले उचित होईल. एका सर्व साधारण कुटुंबातील शिक्षकाच्या पोटी जन्म घेऊन देखील मी दहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या संस्था उभारू शकलो ते केवळ पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाने. साहेबांनी त्यांच्या निर्णयाबाबत फेरविचार करून तो निर्णय मागे घ्यावा आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे. शासकीय यंत्रणांचा वापर करत सुरू असलेल्या एकाधिकारशाही राज्यकारभाराला पर्याय म्हणून, महाविकास आघाडीचे प्रणेते म्हणून पवार साहेबांच्या कडे या देशाचे नेतृत्व करणारे सक्षम नेते या नजरेने पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.