युवा महोत्सवाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष
पनवेल/ वार्ताहर
महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक व महात्मा गांधी मिशन डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल,नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या युवा महोत्सव स्पंदन -२०२३ चा उत्साहात प्रारंभ संपन्न झाला.गुरुवार ,दिनांक २७ एप्रिल रोजी हा सोहळा पार पडला यावेळी महात्मा गांधी मिशन च्या दंत महाविद्यालयात विश्व सुंदरी डॉ .अक्षता प्रभू, जेष्ठ नाट्य व चित्रपट कलावंत अरुण नलावडे, विजय पाटकर, आरोग्य विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. मिलिंद निकुंभ, महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शशांक दळवी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी विश्व सुंदरी डॉ.अक्षता प्रभू यांनी स्पर्धकाना मह्त्वाचे तीन कान मंत्र दिले.त्या म्हणाल्या जीवनात कितीही अपयश आले तरी स्वतः वरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका,सतत काम करीत रहा , शिकण्यास नेहमी तयार रहा. असे त्यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. त्या स्वतः बाल दंत चिकित्सक असून सध्या त्या मॉडेलिंग च्या क्षेत्रात काम करीत आहेत.
जेष्ठ नाट्य व चित्रपट कलावंत अरुण नलावडे यांना स्पंदन ही संकल्पना खूप आवडली . भावी डॉक्टराना त्यांनी सांगितले की मनोरंजन क्षेत्रात खूप उर्जा मिळते. स्पंदन मुळे फक्त करमणूक न होता सामाजिक बांधीलकी वाढते,नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव यांनी नृत्य कलेतील बारकावे व संधी या बद्दलची माहिती दिली. पुढे त्यांनी सांगितले की ,स्वतः ला झोकून देऊन स्पर्धेत सादरीकरण करा , सध्या वेगवेगळे व्यवसाय पुढे गेले आहेत त्या कडे ही लक्ष द्या असा कानमंत्र त्यांनी दिला.
सुरवातीस डॉ श्री वल्ली नटराजन यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व डॉ.जयता वर्मा यांनी प्रास्ताविक सादर केले .
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शशांक दळवी यांनी स्पंदन २००५ साला पासून कसे सुरु आहे व पुढे हे कसे सुरु राहील ते विषद केले. या अभियानाचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होत आहे व त्यांच्या तील कलेला कसा वाव मिळत आहे भविष्यात त्यांच्यातील कला कशा वाढतील हे देखील स्पष्ट केले.
आरोग्य विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ श्री मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की स्पंदन च्या कार्यक्रमात आशियात पहिल्यांदा नृत्य कलेला मान दिलेला आहे.कुंभार पुढे म्हणाले की या स्पर्धेकरता तीन निरनिराळी केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. नृत्यविश्काराची जबाबदारी महात्मा गांधी दंत चिकित्सा विद्यालयावर देण्यात आली आहे. तसेच त्यांनी स्पर्धेतील विविध टप्पे निकष आणि अन्य तांत्रिक बाबींच्या बद्दल उपस्थितांना अवगत केले.
उद्घाटन सत्राचे आभार डॉ. श्री वल्ली नटराजन यांनी मानले .तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.अमोल म्हात्रे व डॉ.दिव्या नाईक यांनी केले.
या उद्घाटन प्रसंगी महात्मा गांधी मिशन चे विश्वस्त सुधीर कदम , विद्यार्थी कल्याण चे मनोज कुमार मोरे विविध विभागाचे प्राध्यापक , विद्यार्थी स्पर्धक व इतर प्रेक्षकांची यांची उपस्थिती होती.
Be First to Comment