Press "Enter" to skip to content

मुख्यमंत्रीपुत्राचा मेहुणा बनतोय स्टोन माफिया


महाविकास आघाडी चा सनसनाटी आरोप

स्वराज्य स्टोन क्रशर च्या दडपशाही विरोधात महाविकास आघाडी आक्रमक

पनवेल / प्रतिनिधी.24 एप्रिल.

सोमवार दिनांक २४ एप्रिल रोजी पनवेलच्या काँगेस भवन येथे झालेली पत्रकार परिषद भलतीच सनसनाटी ठरली. जुन्या उरण पनवेल रस्त्यावर नवी मुंबई विमानतळाचे काम सुरु आहे. याठिकाणी स्टोन क्रशिंग व्यवसाय गेली अनेक वर्षे सुरु आहे. कित्येक नेते आणि लोकप्रतिनिधी देखील या व्यवसायात असल्याचे सूत्रांच्या कडून समजते. परंतु विमानतळ गाभा क्षेत्रातील काम सुरु झाल्यापासून हि परिस्थिती झपाट्याने बदलत असून याठिकाणी स्टोन माफिया त्यांचे हात पाय पसरण्याच्या तयारीत असल्याचे विदारक दृश्य दिसत असल्याचे महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले. काँग्रेस चे पनवेल शहर अध्यक्ष सुदाम पाटील यांनी प्रास्ताविक करत हा मुद्दा पटलावर मांडला. ते म्हणाले कि स्वातंत्र्य पूर्व काळात ज्या प्रकारे ईस्ट इंडिया कंपनी एकाधिकारशाहीने कारभार करत असे नेमका तासाचा कारभार स्वराज्य स्टोन क्रशर हि कंपनी करत आहे. त्यांचे नाव जरी स्वराज्य असले तरीही भूमिपुत्रांना पारतंत्र्यात ठेवण्याचे काम हि मंडळी करत आहेत. या कंपनी व्यतिरिक्त अन्य कुणीही फायनल प्रॉडक्ट्स विकायची नाहीत असा फतवा या कंपनीने काढला असून मालाचा दर दुपट्टीने वाढून ठेवला आहे. अर्थातच यामुळे घरांच्या किमती गगनाला भिडणार आहेत. दडपशाहीने कारभार करताना हि मंडळी कोणालाही जुमानत नाहीत. कारण या कंपनीच्या संचालक मंडळातील मुख्य संचालक हे मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे असल्याचा सनसनाटी आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी केला. ते म्हणाले कि भाजपा चे गिरीश महाजन आणि कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांचे निकवर्तीय असणारे दादासाहेब सूर्यवंशी,सुनील म्हस्कर व अन्य असे चार लोक या कंपनीचे संचालक आहेत. सरकारी वरदहस्त असल्यामुळे हि कंपनी एकाधिकारशाही वापरात आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करून स्टोन माफियांवर अंकुश बसवावा अन्यथा महाविकास आघाडी तीव्र आंदोलन छेडेल. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक रमेश किर,राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,पनवेल शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष सुदाम पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस चे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील,कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, शेकाप चे पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू, काँग्रेस च्या पनवेल तालुका ओबीसी सेल चे अध्यक्ष वैभव पाटील,काँग्रेस च्या पनवेल शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निर्मला ताई म्हात्रे,युवक काँग्रेस चे रायगड जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे,शिवसेनेचे रामदास पाटील,विश्वास पेटकर,माजी नगरसेवक लतीफ शेख,शशिकला सिंग,अमित लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.