मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी कळंबोलीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
सिटी बेल ∆ कळंबोली ∆
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी म्हणजेच ९ फेब्रुवारी २०२३ रोजी, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता शिवसेना नेते रामदास शेवाळे यांच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन कळंबोली येथे मोठ्या थाटामाटात करण्यात आला. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या भव्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

अनेक कार्यकर्ते, नागरिक तसेच शुभेच्छुक या कार्यक्रमाला उपस्थित होते. शुभेच्छा देण्यासाठी, मोठा जन समुदायाने या कार्यक्रमास हजेरी लावली.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून बाळासाहेबांचीं शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थित शुभारंभाचीं फीत कापण्यात आली.

Be First to Comment