Press "Enter" to skip to content

कळंबोलीत शरद पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी रुद्राभिषेक व होम हवन

सिटी बेल ∆ कळंबोली ∆ 

हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे पूर्वीच्या काळी दीर्घायुष्यासाठी व आजार, व्याधींवर मात करण्यासाठी होम हवन करण्याची प्रथा होती. होमहवनामुळे सकारात्मक लहरी निर्माण होत असतात. ज्याठिकाणी औषधोपचार एका विशिष्ट मर्यादेपर्यंत येऊन थांबतात, त्याठिकाणी होमहवन, रुद्राभिषेक व दैवी शक्ती या माध्यमातून आजारांवर मात करता येऊ शकते अशी आमची भावना आहे. शरद पवार हे सध्या एक मोठ्या आजाराशी झुंज देत आहेत. मागील महिन्यातही त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यामुळे शरद पवार यांना उदंड आयुष्य लाभावे व त्यांची प्रकृती उत्तम राहावी या भावनेतून सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्यावतीने रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आल्याची भावना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील यांनी व्यक्त केली.          

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कळंबोली से.१४ येथील श्री शिव व शनी मंदिरात रुद्राभिषेक व होम हवनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी सुदाम पाटील बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सूरदास गोवारी, जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, माजी जि.प. सदस्य महादेव पाटील, संदीप म्हात्रे, नारायण खरजे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राजवन, आर एन यादव, राजकुमार पाटील, मजदूर सेल जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी, महिला कार्याध्यक्षा शशिकला सिंग, अनुराधा रंगारी, युवती जिल्हाध्यक्षा प्रज्ञा चव्हाण, प्रतिमा जाधव, चंद्रकांत नवले, बळीराम नेटके, मंगेश नेरुळकर, शाबाज पटेल रंजीत नरुटे, स्वाती रौंदळ, रेणुका पगारे, अस्मिता पाटील, सुदेशना रायते, जयश्री खटकाले, राजू भाई मुलानी, शीला घोरपडे, सुनीता माळी, राजश्री कदम, संगीता पवार, जयश्री देसाई, आरती पोतदार, दीपाली ढोले, मीना विश्वकर्मा, महेश पाटील, भागवत पाटील, हराळे महाराज, बळवंत पवार, बबन पवार, नितीन म्हात्रे, नागेश पवार, अमित लोखंडे, विनीत कांडपिळे, विलास माघाडे, अरुण ठाकूर, रमेश राव, अर्जुन गायकवाड यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.         

राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सूरदास गोवारी म्हणाले, शरद पवार हे आपल्या देशाचे नेते आहेत. आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्यांच्या कार्यपद्धतीविषयी आदराची भावना आहे. या वयातही त्यांचा काम करण्याचा उत्साह व जोश एखाद्या तरुणालाही लाजवेल असा आहे. या धर्तीवर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कळंबोलीत सुदाम पाटील यांच्या माध्यमातून आयोजित रुद्राभिषेक यज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला याचे समाधान वाटते. शरद पवार यांना परमेश्वराने निरोगी व उदंड आयुष्य देवो ही सदिच्छा व्यक्त करतो.       

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.