Press "Enter" to skip to content

आगरदांडा ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन

आठ दिवसात दिघी पोर्ट मधील आगरदांडा युनिट शीघ्र गतीने सुरु होईल :- आमदार महेंद्र दळवी

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

दिघी पोर्ट ने स्थानिकांची बिले गेल्या कित्येक वर्ष थकवली होती.त्यांना त्यांची बिले मिळावीत तसेच नोकरीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी दिघी पोर्ट चे काम थांबवण्यात आले होते.परंतु आता स्थानिकांनाच सदरचे पोर्ट सुरु होण्याची विनंती केल्यामुळे येत्या आठ दिवसात दिघी पोर्ट मधील आगरदांडा युनिट वेगाने सुरु होण्यासाठी माझी सहमती असून लवकरच हे युनिट सुद्धा शीघ्र गतीने सुरु होईल अशी ग्वाही अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे.
ते आगरदांडा येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्धघाटन करण्यासाठी आले असता आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आगरदांडा ग्रामपंचायत येथील नूतन इमारतीसाठी १६ लाख रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्यात आली.सदरील इमारतीचे उद्धघाटन आमदार महेंद्र दळवी व आगरदांडा सरपंच रुशाली डोंगरीकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी सदरील कार्यक्रमासाठी उपसरपंच युसूफ अर्जबेगी, मुरुड शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर,सरपंच रुशाली डोंगरीकर,विजय गीदि,ग्रामसेवक सुशांत ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील,नाहिदा डावरे,प्रीती भाटकर,शांताराम हिलम,भरती कांबळे,जिल्हा संघटिका शुभांगी करडे,अलिबाग तालुका प्रमुख प्रफुल्ल मोरे,संजय गांधी योजनेचे अध्यक्ष भरत बेलोसे, नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाई सुर्वे,दिनेश मिणमिने,निलेश घाटवळ,आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार दळवी आपल्या भाषणात म्हणाले कि,अलिबाग पेक्षा मुरुडचा जास्त विकास होण्यासाठी आपण जास्त लक्ष देणार आहोत.गावाचा सर्वांगीण विकास ज्या ग्रामपंचायत इमारती मधून होतो ती इमारत सुसज्ज असावी यासाठी मी माझा आमदार निधी देऊ केला आहे.रायगड जिल्हा परिषदेत बदल होणे खूप गरजेचे आहे.रायगड जिल्हा परिषदेला खूप मोठा विकास निधी उपलब्ध होत असतो जर बदल झाला तर सर्वाधिकविकास निधी विविध गावांसाठी देऊन मोठा बदल घडवून आणू असे ते यावेळी म्हणाले.लोकांनी चालत्या गाडीत बसावे थकलेल्या गाडीत बसलात तर प्रवास लांबणार आहे.तेव्हा आगामी निवडणुकीत लोकांनी बदल घडवून नगरपरिषद व जिल्हा परिषद आमच्या ताब्यात द्या आपणाला हवा असणारा विकास करवून दाखवू असे ठाम प्रतिपदान आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे.मुरुड तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला नवीन इमारत मिळण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे यावेळी दळवी यांनी सांगितले.

यावेळी आगरदांडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व मुरुड शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर यांनी आमदार दळवी यांचे ऋण व्यक्त करून आगरदांडा ग्रामपंचायत मधील पाणी पुरवठा नवीन लाईन उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत मधील अंतर्गत रस्ते तयार करून देणे,अश्या विविध कामांसाठी आमदारांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे गावाचा विकास करू शकलो असे प्रतिपदान यावेळी त्यांनी केले.

आगरदांडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच युसूफ अर्जबेगी यांनी सर्वप्रथम दिघी पोर्ट मधील आगरदांडा युनिटचे काम जलद गतीने सुरु होण्यासाठी आमदार साहेबानी लक्ष घालावे.कारण गेले कित्येक वर्ष काम बंद असल्याने या बंदराचा विकास खुंटला आहे.सदरचे बंदर सुरु झाल्यावरच स्थानिकांना नोकरी व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.तरी लवकरत लवकर पोर्ट सुरु करण्याची विनंती यावेळी त्यांनी केली.तसेच आगरदांडा मुस्लिम समाजास मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार सुद्धा अर्जबेगी यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन किसन कांबळी यांनी केले.सदरील कार्यक्रमासाठी आगरदांडा ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.