सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकुब सय्यद ∆
नागोठणे विभाग सहकारी भात गिरणीमध्ये ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चाच्या वतीने ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी शुक्रवार 18 नोव्हेंबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांचा मोर्चाच्या नियोजनाबाबत नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांची घेण्यात आलेल्या सभेत ओबीसी जनमोर्चात हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष समन्वय समिती रोहा तालुकाध्यक्ष अनंत थिटे यांनी केले. यावेळी नागोठणे विभागीय अध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ओबीसी संघटना विभागीय नेते शिवराम शिंदे, भाई टके,मधुकर ठमके,दत्तात्रेय झोलगे व विलास चौलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा तालुकाध्यक्ष अनंत थिटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व मान्यवरांच्या सहमतीने ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या नागोठणे विभागीय अध्यक्ष पदासाठी भाईसाहेब टके यांनी कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे यांची शिफारश केली त्याला सुनील लाड यांनी अनुमोदन दिल्याने शिंदे यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याला त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी समाज बांधवांचा नेण्यात येणार्या मोर्चाबाबत विचार विनियोग व चर्चा करण्यात आली.
यामध्ये मोर्चा बाबत विभागा विभागात जाऊन बैठका घेणे,तेथील लोकांबरोबर चर्चा करणे व मोर्चाची माहिती देणे,सहभागी लोकांची संख्या व त्यांच्या वाहनांची व्यवस्थासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यानंतर अनंत थिटे यांनी मोर्चाबाबत माहिती देऊन विभागातून जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी सामील होण्याचे आवाहन केले.
शिवराम शिंदे यांनी विभागातील ओबीसी बांधवांना एकत्रीत करून संघटना मजबूत करण्याकरिता या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले. या बैठकीत बाळासाहेब टके,प्रभाकर ठाकूर,यशवंत हळदे, एकनाथ ठाकूर, सुनील लाड, प्रमोद जांबेकर,चंद्रकांत भोईर, सुनिल नावले, दिनेश घाग, भारत भोय, पत्रकार महेश पवार व महेंद्र माने तसेच ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment