सिटी बेल ∆ पनवेल ∆
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक संघटना व पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी , युतीकडे व अन्य पक्षांकडे अनेक संघटनांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. मात्र या सर्वांमध्ये सध्याचे कार्यसम्राट आमदार बाळाराम पाटील यांचे पारडे जड असून आगामी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पुन्हा तेच निवडून येण्यासाठी दावेदार असल्याची माहिती आमच्या सर्वेक्षणातून मिळालेली आहे.
युतीमुळे शिंदे गट व भाजपा यांच्यासमोर उमेदवार घोषित करताना पेच निर्माण झालेला आहे. अशातच सर्वच संघटना व पक्षानी बाळाराम पाटील यांची मागणी केली असून प्रत्येक पक्ष त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न सुरू करत आहे. आज पर्यंत ज्या ज्या पक्षांनी व संघटनेने उमेदवार जाहीर केले आहे, त्यात कार्यरत आमदार बाळाराम पाटीलच निवडून येणारा व जिंकणारा उमेदवार सर्वांना दिसत आहे.
सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सतत निस्वार्थपणे झटणारा, त्यांना न्याय मिळवून देणारा मनमिळाऊ व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या कामाची चर्चा महाराष्ट्रभर असून, शिक्षकांची लोकप्रियता असलेला उमेदवार म्हणून बाळाराम पाटील यांच्याकडे पाहिले जाते.
या निवडणुकीत अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले आहेत. तर काही सेवानिवृत्त झालेले शिक्षकही उत्सुक आहेत. परंतु सर्वांच्या तोंडून एकच नाव आमच्या सर्वेक्षणातून पुढे पुढे येत आहे ते म्हणजे बाळाराम पाटील !
अनेक शिक्षकांची मतं आजमावल्या नंतर त्यांनी सांगितले की विद्यमान आमदारांनी शिक्षकांच्या वैयक्तिक समस्या अगदी कोवीड काळातही सोडविल्या आहेत. अटीतटीच्या वेळेस शिक्षकांचा पगार बंद किंवा कमी करता कामा नये यासाठी आतोनात प्रयत्न केले. कोवीड मदत / तसेच वेळी मेडीकल सहाय्य करण्यासाठी तत्परता दाखविली. शाळाना सर्वोतोपरी मदत केली. शिक्षण विभागातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी संवाद दौरे आयोजित केले. शाळांना संगणक , गणितपेटी, प्रिंटर, कंपास पेट्या, सारख्या वस्तू भेटी दिल्या, भौमितिक आकृत्या, ब्लॅकबोर्ड यांसरखे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले.
शिक्षक नसलेल्या उमेदवारांच्या बाबतीत शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि संपूर्ण पाठिंबा असलेला उमेदवार बाळाराम पाटील यांचे पारडे जड असल्याचे पुढे येत आहे.
Be First to Comment