Press "Enter" to skip to content

कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न

आरोग्य, पाणी पुरवठा,बाजार पेठेतील रहदारी या विषयावर कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत नगर परिषदेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, विषय पत्रिकेवर नसलेल्या मात्र नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर जोरात चर्चा झाली.

नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सभेस विषय पत्रिकेवर 16 विषय ठेवण्यात आले होते.सभेस उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका संचिता पाटील, प्राची डेरवणकर,विशाखा जिनगरे,वैशाली मोरे, मधुरा चंदन, भारती पालकर, ज्योती मेंगाळ,पुष्पा दगडे, सुवर्णा निलधे, स्वामिनी मांजरे, नगरसेवक नितिन सावंत, राहुल डाळींबकर, बळवंत घुमरे, विवेक दांडेकर,शरद लाड, उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, संकेत भासे, हेमंत ठाणगे उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीस सभापती राहुल डाळींबकर यांनी नगरपरिषदेस देशात पाचवा क्रमांक मिळाला त्याबद्दल सर्व सफाई कामगार, कर्मचारी, मुख्याधिकारी, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. रायगड जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेस अभिनंदनचे प्रशस्तीपत्र पाठवले त्याचे वाचन सभागृहात करण्यात आले.

विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक 11 सन 2022 करिता दिवाळी पूर्व सानुग्रह अनुदान नगरपरिषदेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांना मिळावे हा विषय सभागृहात चर्चेला आला त्यावर राहुल डाळींबकर यांनी मी स्वतः लेबरफ्रंट चा अध्यक्ष आहे मात्र मी कर्मचाऱ्यांची बाजू घेणार नाही असे सांगितले,शासन आपल्याला किती पगार देतो त्याप्रमाणे आपण काम करतो का? याचे आत्मपरीक्षण कर्मचाऱ्यांनी केले पाहिजे असे सांगितले.कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे 25 हजार रुपयांची मागणी केली आहे त्यावर सभागृहात नितिन सावंत, राहुल डाळींबकर, स्वामिनी मांजरे, उमेश गायकवाड यांनी चर्चा केली, अखेर सर्वांनी 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे सभागृहात मान्य केले.

विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा संपली त्यानंतर बळवंत घुमरे यांनी नगरपरिषद हद्दीत रोज अतिक्रमणे होत आहे नगरपरिषद प्रशासनाचा अंकुश राहिला नाही असे सांगितले, हद्दीत रोज नविन नविन टप-या होत आहे, बाजार पेठेतील रस्त्यावर फेरीवाले कसेही बसत आहेत त्यांनी रस्ता अडवला आहे, नागरिकांना चालणे कठीण झाले आहे, रोज वाहतूकीस अडथळा होत आहे, नागरिक रस्त्यालगत कचरा टाकत आहेत सफाई कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, नगरपरिषद हद्दीत अनेक ठिकाणी पाणी कमी दाबाने जात आहे त्यामुळे नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना जावे लागत आहे.नागरिकांच्या तक्रारी नुसार नगरपरिषद कर्मचारी अतिक्रमण होत असलेल्या ठिकाणी अतिक्रमण रोखण्यासाठी जात असतात मात्र त्याठिकाणी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांची नावे सांगितली जातात हे बरोबर नाही असे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी सांगितले, अनधिकृत कामावर कारवाई करणे हा प्रशासनाचे काम आहे.

त्यावर मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सभागृहातच समज दिली, यापुढे अनधिकृत बांधकामे, बाजार पेठेतील फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली जाईल असे मुख्याधिकारी गारवे यांनी सभागृहात सांगितले मात्र कारवाई होत असताना लोकप्रतिनिधीनी आम्हाला फोन करू नये अशी विनंती केली त्यावेळी सभागृहाने सर्वानुमते मान्य केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.