सिटी बेल ∆ कांजुरमार्ग ∆ पंकजकुमार पाटील ∆
भारतामध्ये विविध जाती- धर्माचे बांधव आपले सण -समारंभ परंपरेनुसार,चालीनुसार साजरे करत असतात. शेतामध्ये विविध पीके घेणारा शेतकरी राजा सुद्धा त्याचा सण उत्साहात साजरा करताना दिसतो. ईस्ट इंडियन ख्रिस्ती समाजात सुद्धा शेतीशी संबंधित असणाऱ्या “आगेरा” सणाला विशेष महत्व आहे . दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारी ज्याठिकाणी ख्रिस्ती समाजाची वस्ती आहे तिथे साजरा केला जातो .

“आगेरा” सणाचे वैशिष्टय म्हणजे या दिवशी पहाटे ख्रिस्ती बांधव पारंपरिक वेशभूषेत, नटून -थटून आपल्या भात शेतात जाऊन शेतीची पूजा करतात. भाताचे पहिल्या पीकाची विधीपूर्वक कापणी करून ते बैलगाडी -घोडागाडीत आणले जाऊन चर्चमधील पवित्र ठिकाणी चर्चचे फादर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत देवाला अर्पण करण्याची प्रथा आहे. यंदाही हा सण मुंबईतील ईस्ट इंडियन समाजाच्या विविध वस्त्यांवर उत्साहाने साजरा झाला .

कांजूरगावात सुद्धा या समाजाची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. रविवार दि २ ऑक्टोबर रोजी याठिकाणी मोबाय गावठाण पंचायतचे विभाग सरपंच रिगॅन मेन्डोझा , सरपंच जोसेफ डिमेलो तसेच फादर जोसेफ बोर्झेस , फादर विल्फ्रेड वाझ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “आगेरा” सण साजरा करण्यात आला . या सणात येथील ख्रिस्ती समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभाग घेतला होता .








Be First to Comment