माजगांव अदिवासी वाडीतील तरुणांचा भाजपामध्ये प्रवेश
तुमच्या समस्या सोडविणे हाच आमचा ध्यास : आमदार महेश बालदी
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
माजगांव अदिवासी वाडीतील असंख्य महिला व तरुण वर्गांनी उरण चे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी ते बोलतांना म्हणाले की, तुमच्या समस्या सोडविणे हाच आमचा ध्यास असून,तुमचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असे गौरउद्दगार बालदि यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रुप ग्राम पंचायत माजगांव माजी सरपंच मथुराबाई वाघे ,मधुकर वाघे,बाबू जाधव,काशिनाथ वाघे,धोंडू वाघे,मोतीराम वाघे,गोविंद वाघे,राम वाघे, महादु वाघे,कमलाकर वाघे, भास्कर वाघे,बाळाराम वाघे,मदन वाघे अदि सह असंख्य कार्यकर्ते यांनी कमल हातात घेवून बीजेपी मध्ये प्रवेश केला.
यावेळी तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, सरपंच गोपीनाथ जाधव,उप सरपंच नितिन महाब्दि,जनार्धन जाधव, जयेश पाटील, विश्वनाथ पाटील,( वाशिवली )संदेश मालकर संदिप काठावले,रमेश वाळकु जाधव,प्रकाश ल. जाधव, पंकज सं.जाधव,शांताराम जाधव, समिर मालकर,संदेश जाधव, राजेश जाधव,अरुण जाधव
अदि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच गोपीनाथ, तसेच तुकाराम जाधव,रमाकांत जाधव यांच्या विकास कामाचा धडाका सातत्याने सुरुच असून आज त्यांच्या माध्यमातून आज या वाडीतील तरूण,महिला वर्गांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला.आज अदिवासी महिला राष्ट्रपती या पदावर विराजमान असून यामध्ये बीजेपी यांचे मोलांचे योगदान आहे.
आज प्रत्येकांचा राजकारण
वरून विश्वास उडाला असून, मात्र बीजेपी च्या माध्यमातून आपण तुम्हास सहकार्य करणार आहोत.या ठिकाणी असलेल्या विविध समस्या मार्गी लावणार आजपर्यंत जे कुणाला शक्य झाले नाही ते आम्ही सत्यात उतरविले जाईल.बीजेपी यांने कोरोनांच्या काळात दोन वर्ष मोफत अन्न वाटपण्यांचे काम केले. त्याच बरोबर या ठिकाणी गावठाण,लाईट, रस्ता अदि प्रश्न मार्गी लावले जाईल, असे आश्वासन यावेळी आदिवासी बांधवांना दिले.
ग्रूप ग्राम पंचायत माजगांववाडी येथे विविध समस्या भेडसावत असतांना त्या मार्गी लावण्यांचे काम आमदार महेश बालदि यांच्या माध्यमातून पुर्ण होणार असून जिथे विकास तेथे कार्यकर्ते असे समीकरण बदलले असून आज शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ला खिंडार पाडून पीजेपी मध्ये पक्ष प्रवेश केला आहे. – तुकाराम जाधव,सामाजिक कार्यकर्ते आंबिवली
Be First to Comment