महिला सुरक्षेसाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस महिला आघाडीचा पुढाकार : महीलांसाठी विषेश हेल्पलाइन नंबर सुरू
सिटी बेल ∆ पनवेल ∆
लडकी हुं लड सकती हुं असा कानमंत्र देत महिला सक्षमीकरणाकरता कायम प्रयत्नशील असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखीन एक पाऊल पुढे जात महिला सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा वूमन्स हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पनवेल शहर जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने पनवेलच्या काँग्रेस भवन येथे वुमन्स हेल्पलाइन नंबर चे अनावरण नुकतेच संपन्न झाले.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसुझा यांच्या संकल्पनेतून या हेल्पलाइन नंबर ची निर्मिती करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याद्वारे हा हेल्पलाइन नंबर जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू झाले आहे. पनवेलच्या काँग्रेस भवन येथे हा हेल्पलाइन नंबर माता भगिनींच्या सेवेमध्ये रुजू करण्यात आला.
महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार, छेडछाडीची प्रकरणे, घरेलू हिंसा, कामाच्या ठिकाणी होणारा त्रास या साऱ्या घटनांसाठी महिला या हेल्प नंबर वरती फोन करून मदत मागू शकतात. याशिवाय वैद्यकीय उपचार, सुविधा अथवा शाळा कॉलेजातील प्रवेश यासाठी देखील मदतीची तजवीज आहे. अल्प उत्पन्न गटातील महिला, कष्टकरी महिला या बऱ्याचदा भीतीपोटी अथवा कुचंबणा होते म्हणून तक्रार करण्यास धजावत नाहीत. बऱ्याचदा कुटुंबाचे नाव बदनाम होईल म्हणून देखील पीडित महिलांवरती तक्रार न करण्याचा दबाव टाकण्यात येतो. अशा प्रकरणांच्यात गुप्तता पाळण्याची देखील तजवीज असल्याचे निर्मलाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच त्या म्हणाल्या की येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची खातरजमा देखील करण्यात येईल जेणेकरून हेल्पलाइन नंबरचा गैरवापर होणार नाही. 1800–203-0589 या टोल फ्री क्रमांकावरती गरजवंत महिला कधीही फोन करू शकतात.
हेल्पलाइन नंबरच्या अनावरण सोहळ्याला पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या समवेत महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे,पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज नाथा म्हात्रे पनवेल जिल्हा सरचिटणीस आणी सहकार सेल चे उपाध्यक्ष मल्लीनाथ गायकवाड ,म.प्र.म.कॉ. सरचिटणीस चंद्रकला नायडू,नगरसेविका मंजुळा कातकरी,पनवेल तालुका अध्यक्षा योगिता नाईक, उपाध्यक्षा प्रेमा आप्पाची , सायरा कूनी, ब्लँक अध्यक्षा खारघर सोनिया सोहोटा,सरचिटणीस निता शेणॉय,विनया पाटील, अंजूम तेरवा,नसरिम मॅडम,रेश्मा खान , अलका ठाकूर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment