सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत तालुक्यातील बौद्ध समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरून तहसिल कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस मोर्चा तहसिल कार्यालयावर गेल्यानंतर पोलिसानी तहसील कार्यालयाच्या गेटवर मोर्चा अडवला.
त्यावेळी उपस्थित समुदायास राहुल डाळींबकर, अँड. कैलास मोरे, सुनिल जाधव, अॅड. सुमित साबळे, उत्तमभाई जाधव, नगरसेवक उमेश गायकवाड,धर्मेंद्र मोरे, हरिश्चंद्र यादव, सुभाष गवळे,सुनिल गायकवाड, रजनी गायकवाड, हिराबाई हिरे, पवार, वैभव केदारी, सम्यक सदावर्ते यांनी मार्गदर्शन केले. यावेळेस सूत्रसंचालन अरविंद मोरे यांनी केले तर आभार सुनिल देहु गायकवाड यांनी केले.
त्यानंतर शिष्टमंडळाने तहसिलदार डॉ. शितल रसाळ यांना निवेदन देवुन शासनाकडे सबंधित महिलेने महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाबददल अपशब्द व अवमानकारक पोस्ट फेसबुकवर केली होती सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी त्या पोस्टला समर्थन करणा-या आरोपींना अटक केलेली नाही तर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीत बौद्ध समाजावर झालेल्या अन्यायाबाबत योग्य ती भुमिका प्रशासनाने न घेतल्यास यापेक्षा तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
सदर मोर्चामध्ये कर्जत तालुक्यातील सर्व पक्ष, संस्था, संघटना तसेच बौद्ध महिला, पुरुष, विद्यार्थी, वयोवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment