Press "Enter" to skip to content

आरपीआयच्या अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्षपदी प्रमोद गायकवाड यांची नियुक्ती

सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली असून या फेरनिवडीत अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी प्रमोद गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रायगड जिल्हा आरपीआय पक्षाची नुकतीच अलिबाग शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड, अलिबाग तालुकाध्यक्ष सुनील सप्रे, महिला आघाडीच्या स्नेहल गायकवाड, सविता ओव्हाळ, अंजली गायकवाड, जयप्रकाश पवार, शंकर माने, संजय जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या नियुक्त्या करण्यात आल्या असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाची ध्येय आणि धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम सर्व कार्यकर्त्यांना करायचे आहे आपले नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून देशासह राज्यातील गोरगरीब जनतेला अनेक योजनाचा फायदा होत आहे त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी पक्ष वाढविणे गरजेचे आहे असे यावेळी मान्यवरांनी सांगितले.तर नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी सांगितले की पक्षांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती योग्य प्रकारे पार पाडून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करणार आहोत.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रमोद गायकवाड यांचे अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.