पुणे ते मंत्रालय पायी दिंडीस देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन झालेल्या पुण्यातील भिडेवाडा येथून सुरुवात
सिटी बेल ∆ पुणे ∆
महाराष्ट्रातील शिक्षक आणि शाळांचे प्रश्न हे दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत चालले आहेत. सरकार येतात जातात मात्र,शिक्षकांच्या समस्या जैसे थे असून यावर भरीव काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.याकरिता कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील,नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे,पुणे विभाग शिक्षक मा.आमदार दत्तात्रय सावंत,अमरावती विभाग शिक्षक मा.आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ते मंत्रालय,मुंबई पायी दिंडीस देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन झालेल्या पुण्यातील भिडेवाडा येथून आज सुरुवात झाली.
सदर दिंडी ही मंत्रालयात पोहोचणार असून सरकारपुढे शिक्षकांचे तसेच शाळांचे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडणार असलेबाबत शिक्षक आमदारांनी यावेळी नमूद केले. या प्रयत्नांना जास्तीतजास्त शिक्षकांनी पाठबळ द्यावे,असे आवाहन देखील यावेळी शिक्षक आमदारांनी केले.सदर दिंडीमध्ये राज्यातील अनेक शाळा व शिक्षक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
Be First to Comment