सिटी बेल ∆ समीर बामुगडे ∆ अंधेरी ∆
“आपल्या आसपास अनेक विभूती तनमन धन वेचून कार्य करताना दिसतात. या कार्यातून पैसा कमवून खूप श्रीमंत होणे हा त्यांचा उद्देश नसतो तर त्यातून मानसिक समाधान आणि समाजाचे कल्याण हा त्यांचा उद्देश असतो. भारत वैभव सारखे पुरस्कार त्यांच्या कार्याला केलेला सलाम असतो त्यातून त्या महनिय व्यक्तींना बूस्टर डोस मिळतो आणि ते आपले कार्य अधिकच जोमाने करतात. डॉ दिनेश गुप्ता यांचे सारखे जोहरी अर्थात हिरेपारखी या समाजात विखुरलेल्या हिऱ्यांना एकत्र करून त्यांना व्यासपीठ देतात आणि त्यांचा सन्मान करतात हे खूप प्रोत्साहित करणारे कार्य आहे. ” असे प्रतिपादन आपल्या अनोख्या भारदस्त आवाजासाठी प्रसिद्ध असलेले ख्यातनाम अभिनेते रझा मुराद यांनी मेयर हॉल अंधेरी येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात केले.आपल्या भाषणात शेरोशायरीने त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मिस भारत आयकॉन डॉ नंदिनी गुप्ता , सुविख्यात माईंड ट्रेनर सुदर्शन साबत, ख्यातनाम मराठी साहित्यिक डॉ योगेश जोशी , समाजसेवक व होमिपॅथी सल्लागार डॉ राकेश गुप्ता यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर ख्यातनाम मोटिवेटर आणि ओ. एम.जी बुक चे संस्थापक संचालक यांनी ‘ विजेता ‘ या कार्यक्रमाअंतर्गत भारत आणि इस्राईल दोन्ही देश एक वर्षाच्या अंतराने स्वतंत्र झाले पण मरुभूमी असलेल्या इस्राईल ने आज कुठपर्यंत प्रगती केली आहे हे सोदाहरण पटवून दिले. अनेक किस्से आणि उदाहरणे देऊन त्यांनी उपस्थितांमध्ये जोश भरला.
या प्रसंगी डॉ प्रा. दिनेश गुप्ता यांच्या आगामी ‘ अमृत कलश ‘ पुस्तकाचे तसेच हैद्राबाद येथील करियर कोच अशोककुमार साहू यांच्या ‘ टेन स्टेप्स टू स्टडी इन अब्रोड ‘ या आगामी पुस्तकांचे मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात आले. तसेच डॉ गंगाधर वारके यांनी संपादित केलेल्या ‘ क्रांतीगाथा स्वातंत्र्याची ‘ या ७५ क्रांतिकारकांच्या कथा असलेल्या पुस्तकाच्या ई आवृत्तीचे प्रकाशन अभिनेते रझा मुराद आणि डॉ दिनेश गुप्ता यांचे हस्ते करण्यात आले. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १५ ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आली आणि केवळ १० दिवसांचे आत या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली असून दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. पुस्तकाचे या यशाबद्दल कार्यकारी संपादक डॉ योगेश जोशी यांना भारतवैभव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उत्तरार्धात डॉ लतेश परमार, स्वप्नील देशपांडे,विक्की नूतन प्रकाश गुप्ता , सिद्धेश निफाडकर , डॉ आदित्यन अनिल , सुरेश पांडुरंग सुतार , इंटिरिअर डिझायनर मेघा , डॉ सुमित्रा डी पाटील , अजय पाटील, अशोक कुमार गुप्ता , डॉ राजू रमेकरी, डॉ अशोक बी गुप्ता , सुजित पाटील , डॉ सुनिल पांचाळ, रितेश जैन , राजेंद्र कोलकर , आर्यन सबत , अशोक कुमार साहू , दत्तात्रय पाटील, अनिकेत देशमुख , डॉ आभा जाधव , डॉ साकीर बाटलीवाला , संदीप माळी , डॉ संजीव कुमार , डॉ दिपक सिंग , ओंकार हासे, प्रकाश राठोड, धर्मराज जाधव , डॉ चंद्रकांत सावंत , राजन कुमार आदी विभुतींचा विविध क्षेत्रातील कार्याबद्दल भारत वैभव २०२२ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनिता गुप्ता यांनी केले.
Be First to Comment