पारंपरिक पद्धती काळाच्या पडद्याआड : तुरळक ठिकाणी जुन्या पद्धतीने गौराईला शुंगाराचा साज
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
दिड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाले.आणी तिस-या दिवशी सोनपावलांनी गौराई चे आगमन झाले.यामुळे सर्वत्र ठिकाणी चैतन्यांचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र बदलत्या काळात कागदी मुखवटे, आणी खुर्चीत बसवून नवि कोरी साडी नेसवून हातात बांगड्या, गळय़ात सौभाग्य अलंकार, नाकात नथ, वेणी आणि रुईच्या पानांचा मुखवट्याचा वापर करून पाच सुवासिनींनी या गौराईची सजावट केली जात असे.परंतू बदलत्या युगात प्रत्येकांकडे वेळेची मर्यादा राहीली नाही; त्यातच आताचे युग हे धावपळीचे घड्याळ्यांचे काटे जसे पुढे जात असते तसेच माणूस धावपळ सुरु असते.यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मुर्तीची मागणी वाढली आहे. बदलत्या काळात पारंपारिकतेने घरी सजवलेली गौराई ग्रामीण भागात ही आता तुरळक ठिकाणी पहावयास मिळत आहे.
माहेरवाशिणीच्या रूपात समृद्धीचा जागर गौरी-गणपतीचा हा सण कोकणात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. गौराई म्हणजे घरातील माहेरवाशीण यामुळे तिची सजावट, तेरड्याच्या झाडांचा गुच्छ महिला तयार करून गौराई घरी सजविण्यात आली. संपूर्ण रात्र जागरण करून दुसर्या दिवशी या गौराईचे पूजन केले जाते.रानटी भेंडी, आघाड्याचे पाने, तेरड्याची फुले, आईनाचे फळ, काकडी यांचा वापर करून गौराईचे पूजन करण्यात आले.
तिच्यासाठी जागरण आणि दुसर्या दिवशी या गौराईचे पूजनाला ओवसा असे म्हटले जाते.गौराईचे हे सुखसोहळे महिलावर्ग मोठय़ा उत्साहाने करीत पारंपरिक पद्धतीने विविध गाणी म्हटली जात होती .गौराईच्या जागरणासाठी महिला वर्ग खेळ खेळले दंग झाले होते.अशा भक्तीमय वातावरणात सर्वत्र ठिकाणी चैतन्य निर्माण झाले होते.गणेशाचे आगमन होऊन तीन दिवस उलटले असून, गुरुवारी गौरींचे वाजत गाजत आगमन झाले.काळाच्या ओघात मागे जूनी परंपरा काळाच्या पडद्याआड पडू लागली असली तरी सुद्धा ग्रामीण भागात जुन्या पद्धतीने भारतीय संस्कृती जोपासुन पुजन करण्यात आले.
बदलत्या काळात पारंपारिक साज शुंगार केलेली गौराबाई काळभाय होत चालली आहे.त्या जागी पीओपी गोरी बसविली जाते. मात्र आज ही ग्रामीण भागात भारतीय संस्कृती जपून ठेवली जात असून आजही पारंपारिक पद्धतीने शुंगार केलेली गौरी पहावयास मिळत आहे. – देवकी अतिष म्हात्रे वयाल
Be First to Comment