Press "Enter" to skip to content

कर्जत – खालापूर तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा

बाळासाहेबांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे वाढवीत आहेत : उद्योग मंत्री उदय सामंत

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

‘संघटना एकामेकांवर विश्वास असणारी असावी. रिक्षावाला मुख्यमंत्री, मंत्री पान टपरीवाले, कामगार मंत्री झाले असे हिणवले जाते. तो त्या – त्या व्यवसायाचा अपमान आहे. काय थराला राजकारण चाललय ? आरोग्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे. याची घोषणा आपल्या सरकारने केली. असे आता स्थानकांवर अन्याय होणार नाही. उद्योजकांची दादागिरी चालणार नाही. आम्हाला गद्दार, भडगुंजे म्हणून हिणवले जाते परंतु आपण 2019 ला निवडणुकीत सामोरे जाताना मोदी व बाळासाहेबांचा फोटो लावले होते. हे विसरून चालणार नाही.बाळासाहेबांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे वाढवीत आहेत. ते सर्वांना निश्चित न्याय देतील. आम्ही संयमशील आहोत. त्याला पण मर्यादा आहेत. मात्र आता अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही.’ असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला.

कर्जत – खालापूर तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा किरवली येथील साईकृपा शेळके सभागृहात आयोजन केले होते. सुरुवातीला आदिवासी भगिनींनी पारंपरिक नृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास सुरुवात केले.

यावेळी व्यापीठावर खासदार श्रीरंग बारणे, पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, माजी सभापती अमर मिसळ, सुषमा ठाकरे, खालापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, संतोष भोईर, मनोहर थोरवे, विजय पाटील, रेखा ठाकरे, उल्हास भुर्के, भाई गायकर, पंकज पाटील, परेश पाटील आदी उपस्थित होते.

कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप आणि खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संतोष भोईर यांनी प्रास्ताविकात, ‘खरे तर आपल्याला गद्दार म्हणून हिणवले जाते परंतु निवडणुकीत भाजप – शिवसेना लढली.असे वाटले होते परंतु कोणाची तरी नजर लागली. त्यावरून कोण गद्दार ते तुम्हीच ठरवा.’ असे स्पष्ट केले. महिला जिल्हा आघाडी प्रमुख रेखा ठाकरे आणि उप जिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी शिंदे गटाला समर्थन केल्याबद्दल त्यांचा उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. विजय पाटील

महेंद्र थोरवे यांनी, ‘दोन महिन्यानंतर मी आज पूर्ण समाधानी आहे. ऐतिहासिक उठाव 50 आमदारांनी केला. आणि विसंगाशी संग करून 2019 साली सरकार सत्तेवर आले. मात्र नंतर तीन आमदार शिवसेनेचे आमदार होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार असताना पक्ष प्रमुखांनी त्या आमदाराला पालकमंत्री केले. खरी गद्दारी कुणी की केली ? गद्दारी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी झाली. आम्हाला म्हणतात 50 खोके घेतले. आम्ही ते कसे घेऊ कारण आम्ही बाळासाहेबांचे पाईक आहोत. आत्तापर्यंत 400 ते 450 कोटी रुपयांचा निधी मतदार संघात आणला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी सर्वांनी सज्ज रहा. मनोहर भोईर यांनी त्यांच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करावे. त्यांना यावेळी 40 हजार मतांनी पडल्या शिवाय राहणार नाही’ असे आव्हान भोईर यांना केले.

भरत गोगावले यांनी, ‘आम्ही गद्दारी केली नाही आम्ही उठाव केला. तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडा असे उद्धव ठाकरे यांना सांगितले परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही. खरी शिवसेना कोणती ? आम्ही दुसरा पक्ष काढला नाही किंवा कोणत्या पक्षात गेलो नाही. पर्यावरण मंत्री व्हायला आदित्य ठाकरे यांचे काय योगदान आहे. हे त्यांना विचारा. येत्या निवडणुकीत शिवसेना – भाजपाचे 200 आमदार निवडून येतील.’ असा विश्वास व्यक्त केला. श्रीरंग बारणे यांनी, ‘बाळासाहेबांनी भाजप – शिवसेनेची युती केली. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपाची ताकद नव्हती तो त्यांनी विचार केला नाही कारण हिंदुत्वासाठी त्यांनी आपल्या पक्षाचा विचार केला नाही. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ दिली.’ असे स्पष्ट केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आला. सूत्रसंचालन जगदीश मराजगे यांनी केले.

याप्रसंगी रमेश मते, दिलीप ताम्हाणे, उत्तम शेळके, हरीश काळे, चंद्रकांत चौधरी, प्रभाकर देशमुख , केतन पोतदार, किसन शिंदे, जान्हवी साळुंके, दीपक भोईर, रामचंद्र मिनमीणे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.