Press "Enter" to skip to content

शिंदे सेनेला बबनदादांचा इशारा

शिवसैनिकांना दम देण्याची भाषा सोडून द्या ; अंगावर आलात तर शिंगावर घेऊ : संपर्कप्रमुख बबनदादा पाटील

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

आमच्या शिवसैनिकांना दम देण्याची भाषा सोडून द्या. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ याची जाणीव ठेवा असा कडक इशारा आज पनवेल शहर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विरोधकांना दिला.

या बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्यासह उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, रघुनाथ पाटील, उपमहानगरप्रमुख शंकर ठाकूर, उपमहानगरप्रमुख संघटक लीलाधर भोईर, पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, विभागप्रमुख गणेश म्हात्रे, युवासेनेचे नितीन पाटील, पराग मोहिते, जमील खान, वाहतूक सेनेचे महेश गुरव, नरेंद्र सिंग होंटी, अतुल पळण, निखिल भगत, प्रभाकर गोवारी, रामदास पाटील, मुरलीधर म्हात्रे, बाळाराम मुंबईकर, परशुराम गायकर, शांताराम कुंभारकर, प्रमोद पाटील, महेश भोईर, धाया गोवारी, रामदास गोवारी, एकनाथ गोवारी, प्रेम ठाकूर, मा. उपनगराध्यक्ष अनिल टेमघरे, देविदास पाटील, रजनीश पंडित, नरूला वाईकर, कुणाल कुरघोडे, सुफियान मुकादम, रोहित टेमघरे, विजय शेट्ये, लकीत सोडेवाल, जगन्नाथ म्हात्रे यान यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी सांगितले कि, आज बोटावर मोजण्याइतकी चार जण पक्ष सोडून गेले पण त्यांचे कुटुंब अजूनही शिवसेनेबरोबर आहे. काही गद्दार आमच्या पक्षातील लोकांना धमकवण्याचे, जुन्या केसी-क्लिप बाहेर काढण्याची भाषा करीत आहेत पण अश्या गद्दारांच्या धमक्यांना शिवसैनिक भीक घालत नसून आम्ही बाळासाहेब ठाकरे व उद्धवजी ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत. योग्य वेळी गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा त्यांनी देऊन शिवसैनिकांनी न घाबरता कामाला लागावे, मेळावे, बैठका घ्याव्यात, नाराज लोकांशी संपर्क साधा व आपली ताकद वाढवा असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम पुढाकार घेतल्यामुळे व त्यांनी ठराव केल्यामुळेच आज सत्ताधारी पक्षाने नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्रीय नागरी विमानउड्डाणमंत्रालयाला पाठवण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर केला याचे सर्व श्रेय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे असून त्यांचे अभिनंदन सर्वानी बैठकीत केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.