राष्ट्रवादीकडून खड्यात वृक्षारोपण,तर काॅग्रेस आय, शिवसेना,मनसे, शेकाप इतर पक्ष, सेवाभावी संस्थांकडून रास्तारोको आंदोलन
सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रसायनी पाताळगंगा या औदयोगिक क्षेत्राला जोडणारा दांड – रसायनी हा मुख्य रस्ता आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या, रोजची रहदारी औदयोगिक क्षेत्राकडे जाण्या-येणा-या वाहनांची वर्दळ पाहता दांड रसायनी रस्ता नादुरूस्त असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या रस्त्यावरील रीस, मोहोपाडा या तीन किमीचा रस्ता समस्याग्रस्त असल्याने शिवाय रस्त्यालगतच्या दोन्ही बाजुकडील या रस्त्यावरील बॅंक आफ इंडिया समोर, मोहोपाडा प्रवेशव्दार, रसायनी पोस्ट कार्यालय नजीकच्या परिसरात खड्यांचे साम्राज्य वाढल्याने वाहतुक करणे धोकादायक झाले आहे.
रस्त्यावरील खड्डे चुकवितांना अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
दरम्यान दांड रसायनी रस्त्याची दुरवस्थासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस, इंदिरा काॅग्रेस आय,सम्यक सामाजिक संस्था, खालापूर तालुका पत्रकार संघ व इतर सेवाभावी संस्था यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रुपाली पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.परंतू दुर्लक्ष होत असल्याने रसायनीकर रस्त्यावर उतरले.यासाठी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खड्यांमध्ये झाडे लावून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.तर गुरुवार दि.25 रोजी दुपारी काॅग्रेस आयचे तालुकाध्यक्ष कृष्णा पारंगे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल डवले, शिवसेनेचे रमेश पाटील, सुरेश म्हात्रे, अजित सावंत मनसेचे फुलचंद लोंढे, शेकापचे समीर म्हात्रे,मनोज गाढे, सम्यक सामाजिक संस्थेचे प्रकाश गायकवाड,वंचित बहुजन आघाडी , पत्रकार बांधव आदींसह इतर पक्ष व सेवाभावी संस्था यांनी एकत्र येऊन मोहोपाडा प्रवेशद्वाराजवळ जवळपास एक तास दहा मिनिटे रास्तारोको केला.यावेळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुपरवायझर श्री माने उपस्थित होते.त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करुन हकिकत सांगितली.दांड-रसायनी रस्त्यासाठी जनतेचा उद्रेक पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिका-यानी रस्ता सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी अनेकांनी बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात संताप व्यक्त केला.
या रास्तारोकोत प्रभारी सरपंच माधुरी भगवान जांभळे,माजी पंचायत समिती सभापती कांचन पारंगे,माजी सरपंच कृष्णा पारंगे,काॅग्रेस आय युवक जिल्हाध्यक्ष निखिल ढवळे,सागर सुखदरे, प्रशांत खाने,माजी उपसभापती गजानन मांडे, युवा सेना अधिकारी संतोष पांगत, शिवप्रेमी केदार शिंदे,माजी उपसरपंच दत्तात्रेय खाने, मंगेश पांगत, अजय म्हस्कर, शेकापचे भानूदास जांभळे, ग्रामपंचायत सदस्य श्वेता कांबळे,माजी पंचायत समिती सदस्य दिप्ती म्हात्रे आदीसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते रसायनीकर उपस्थित होते.
Be First to Comment