आम्ही पेणकर विकास आघाडीच्या मार्फत शहराला गतवैभव मिळवून देणार — शिशिर धारकर
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
पेण शहरामध्ये मागच्या दहा वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी विकासाला खीळ बसवत स्वतःच्या फायद्यासाठी नगरपालिकेचा वापर केला असल्याने येणाऱ्या या निवडणुकीत नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडविणार असून आम्ही पेणकर विकास आघाडीच्या माध्यमातून शहराला गतवैभव प्राप्त करून देणार असल्याचे प्रतिपादन आघाडीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पेण नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही पेणकर विकास आघाडीचा जाहीरनामा जाहीर करताना त्यांनी सांगितले की या काळात पेण शहरामध्ये अशुद्ध पाणीपुरवठा, शहराची साफसफाई, अरुंद रस्ते, गटारांची दुरावस्था, घनकचऱ्याची अवस्था, खाजगी इमारतीत शाळा, नाट्यगृहाची दुरावस्था, अनेक ठिकाणी टाकलेले आरक्षण, शहरातील तलावांची दुरावस्था यासह इतर अनेक समस्या शहरांमध्ये आजही असून सत्ताधाऱ्यांनी पेण शहर विकासाच्या नावाखाली भकास केले आहे.
मात्र आघाडीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जात असताना जगात ओळख असणाऱ्या पेण शहरातील गणेश मूर्तिकारांना निर्मितीसाठी लागणारी शाडूची माती रंग व इतर सामान सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून एकाच ठिकाणी अल्प दरात मिळवून देणार, पेणचे वाढते औद्योगीकरण पाहता नागरिकांना जलशुद्धीकरण पाणीपुरवठा, शहराची नियमित साफसफाई, प्रवासी वाहतुकीची सोय, नाट्यगृह, घनकचरा व्यवस्थापन, शाळा यासह क्रिकेट प्रेमींसाठी मैदान सुसज्ज करणार आहोत, अद्यावत मच्छी मार्केट, पार्किंगची व्यवस्था, नवीन भाजी मार्केट तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून येत्या काही दिवसात शहरांमध्ये रक्तपेढीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगून इतर नागरीकांना सुविधा देणार असल्याचे आम्ही कटिबद्ध आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेला संदीप मोने, ध्वजा गुरखा, कमलाकर पाटील, संदीप सुर्वे, सद्दाम भोईर आदिमसह पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
Be First to Comment