Press "Enter" to skip to content

आ. रवीशेठ पाटील यांच्या हस्ते आजी माजी सैनिकांचा सन्मान

भाजपाच्या नागोठण्यातील प्रभागवार माहिती फलकाचे आ. पाटील यांच्या हस्ते अनावरण

सिटी बेल ∆  नागोठणे  ∆ महेश पवार ∆ 

पेण सुधागड मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या पुढाकाराने नागोठणे भाजपाच्या वतीने शहर व विभागातील आजी माजी सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागोठणे शहरातील व विभागातील दोन माजी आणि तीन आजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन विभागातील तरुणांनी भाजपात प्रवेश केला. 

या कार्यक्रमाला भाजपा द.रायगड उपाध्यक्ष मारुती देवरे, ता.सरचिटणीस आनंद लाड, सुभाष पाटील, ऐनघर शक्तिप्रमुख संतोष लाड, अशोक अहिरे, तिरथ पोलसानी सामाजिक कार्यकर्ते सिराज पानसरे यांच्यासह गौतम जैन, नामदेव मढवी तसेच विभागातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी कॅबिनेट मंत्री भाजपा नेते आ. रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या पुढाकाराने नागोठणे शहरातील व विभागातील सैनिकांचा सत्कार समारंभ डॉ. कुंटे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला.

यावेळी उदंड सिताराम रावकर व भानुदास मेहता या दोन माजी सैनिकांचा तसेच किशोर वामन बोरकर, परेश गुणाजी भोय आणि शैलेश महादेव विचारे या आजी सैनिकांचा आ. रविशेठ पाटील यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करत सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी सैनिक उदंड रावकर यांनी आवर्जून सांगितले की, आ. रविशेठ पाटील पाटील यांच्याकडून अनेक वर्षांपूर्वी मिळालेल्या सहकार्यामुळेच मी पनवेल सारख्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकलो. त्यावेळी केलेल्या मदतीबद्दल आज पुन्हा एकदा मी आ. रविशेठ पाटील यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे.

याचबरोबर आ. रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच सौजन्याने शहरातील प्रत्येक प्रभागात प्रवेशव्दारावर प्रभागवार भारतीय जनता पार्टी आपले सहर्ष स्वागत करीत आहे या आशयाचे माहिती फलक लावत आ. रविशेठ पाटील यांच्या हस्ते अनावरण यावेळी करण्यात आले. या अनावरण कार्यक्रमानंतर सचिन मोदी यांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन विभागातील बप्पीचंद्र मेहती, विश्वनाथ ताडकर, नितिन शिंगणकर व जनार्दन चोगले या तरुणांसह उमा अमृतलाल सोलंकी या महिलेने भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी आ. रवीशेठ पाटील यांनी या सर्व प्रवेश केलेल्यांचे पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या. यावेळी आ.पाटील यांना नागोठणे जवळील सुकेळी येथील महिलांनी मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा योजनेसाठी निधि उपलब्ध करण्यासाठी एक निवेदन दिले. पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. रविशेठ पाटील म्हणाले की, शहराध्यक्ष सचिन मोदी खूप चांगला काम करत आहेत. ते चांगल्या तऱ्हेने पक्ष वाढवत आहेत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महिला व तरुण मुले पक्षात प्रवेश करत आहेत ही निश्चितच चांगली गोष्ट आहे . पक्ष वाढीसाठी सर्व ती मदत एक आमदार म्हणून मी त्यांना करणार आहे . पक्ष अजून मजबूत करण्यासाठी सचिन मोदी सारख्या तरुणांना आम्ही यापुढे अधिक जबाबदारी देेेण्यात येेेईल. सचिन मोदी यांनी प्रत्येक प्रभागात भारतीय जनता पक्षाचे स्वागत फलक लावून निश्चितच खूप चांगलं काम केलं आहे. तसेच  नागोठणे गावातील विविध प्रश्नाकडं ते प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे. पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत असून पुढील काळात त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी देऊन पक्ष संघटना अजून मजबूत होईल अशी खात्री असून सुकेळी येथील पाणी प्रश्नाबाबत अधिवेशनानंतर निधी उपलब्ध करून देणार असल्याचे शेवटी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.