Press "Enter" to skip to content

कर्जत येथे भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथ मधील 10 घरांवर तिरंगा फडकविण्यासाठी प्रयत्न करावा : आमदार प्रशांत ठाकूर

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

आपण आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणे आपल्या देशाचा 75 व वाढदिवस साजरा करूया. आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बूथ सक्षम करण्यास सांगितले आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी बूथ मधील दहा घरांवर तिरंगा लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करून मदत करा. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यथा आपल्याला समजतील. आपला पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्र सरकारच्या योजना त्या त्या व्यक्ती पर्यंत पोहोचतात की नाही ? याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.’ असे महत्वपूर्ण प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.

कर्जत शहरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते फित सोडवून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा, श्रीनिवास कोडरू, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल. तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, किसान मोर्चा कोंकण समन्वयक सुनील गोगटे, सरचिटणीस संजय कराळे, रमेश मुंढे, मंदार मेहेदळे आदी उपस्थित होते. वसंत भोईर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी प्रास्ताविक केले.

प्रशांत ठाकूर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला अभिमान वाटावा असे कार्य करीत आहेत. आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे. अटलजी जेंव्हा पंतप्रधान असताना त्यांनी एक महत्वपूर्ण योजना आणली. या योजनेला त्यांनी स्वतःचे नाव न देता पंतप्रधान सडक योजना हे नाव दिले. तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रपतीपदी र्दौपदी मुर्मु यांच्या रूपाने एका आदिवासी महिलेला विराजमान केले. 2014 साली 282 जागा तर 2019 साली 303 जागा मिळविल्या तरी सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन मोदीजी काम करीत आहेत. यापूर्वी एखादी साथ आली की परदेशातून लस घ्यावी लागत असे. प्रसंगी त्यासाठी हाजी हाजी करावी लागत होती पण मोदींजींनी लस उत्पादनासाठी अर्थ सहाय्य करून कोरोनाच्या दोन लसी उपलब्ध करून दिल्या आणि त्या देशातील सर्व जनतेला मोफत देत आहेत. भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने काम करीत आहेत. हे कार्यालय नेहमी उघडे राहून या कार्यालयातून लोकांची कामे झाली पाहिजेत. अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस राजेश भगत यांनी केले. वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नगरसेवक बळवंत घुमरे, विशाखा जिनगरे, स्वामीनी मांजरे, बिनीता घुमरे, माजी नगरसेवक अरविंद शेलार, प्रदीप घावरे, आकाश चौधरी, राजेश चौधरी, मृणाल खेडकर, स्नेहा गोगटे, प्रकाश पालकर, शर्वरी कांबळे, श्रद्धा कराळे, दिनेश सोलंकी, मारुती जगताप आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.