पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य सभागृह उभारणीसाठी निधी मिळावा
: आमदार प्रशांत ठाकूर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
सिटी बेल ∆ मुंबई ∆ प्रतिनिधी ∆
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर ११ मधील भूखंड क्रं. ६ या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य सभागृह उभारणीसाठी निधी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन केली आहे. यावेळी आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिकेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका हद्दीत शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे सभागृह उभारणेकरीता कळंबोली, सेक्टर ११. भूखंड के. ६सी / १ सामाजिक आरक्षित या भूखंडाची मागणी सिडको प्राधिकरणाकडे करण्यात आली होती.
कळंबोली येथील सेक्टर ११ मधील भूखंड के ६सी / १ (कम्युनिटी सेंटर) क्षेत्र १४९९.९६ चौ. मी. या जागेमध्ये महासभा ठराव क्र. २८१ दि. २०/२/२०२१ ला अनुसरून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासंदर्भात नकाशे, आराखडा तयार करण्यात आलेला असून अंदाजित आठ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
सदर जागेवर तळ आणि २ मजली इमारत प्रस्तावित करण्यात आलेली असून प्रस्तावित इमारतीमध्ये तळ मजल्यावर पार्किंग, पहिल्या मजल्यावरती बहुउद्देशीय हॉल (३७७२ चौ. फुट) असा संकल्पीय आराखडा तयार करण्यात आला आहे.
सभागृह, कार्यालय, स्वच्छतागृह इत्यादी व दुसया मजल्यावर अभ्यासिका (२००० चौ. फुट) व वाचनालय (१७७१ चौ. फुट) याची तरतूद करण्यात आली असून या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ १७२५.४२ चौ.मी. (१८५६५.५२ चौ. फुट) असे आहे. त्या अनुषंगाने आपल्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर -११ मधील भूखंड क्रं. ६ या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य सभागृह उभारणीसाठी अंदाजित आठ कोटी रूपये निधी उपलब्ध व्हावा, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीत नमूद केले आहे.
Be First to Comment