कितीही संकटे आली तरी निष्ठावंत शिवसैनिक उभा राहिल : जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर
सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
मोहोपाडा येथील साईबाबा मंदिराच्या सभामंडपात वासांबे रिस जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच वडगाव जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.
यावेळी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर म्हणाले की तुमचा खेळ गुवाहाटीला करा, शिवसैनिक ठामपणे उभा आहे.संकटे आली तरी निष्ठावंत शिवसैनिक उभा राहिल.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी वासांबे मोहोपाडा आणि वडगाव जिल्हा परिषद विभागातील पदाधिकारी आढावा बैठक पार पडली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीप्रतिमा आणि महा पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पंन करुन दिपप्रज्वलन करुन बैठकीला सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांना भगवे वस्त्र व पुष्पगुच्छ देवून वासांबे जिल्हा परिषद विभागाच्यावतीने आभार मानण्यात आले.
माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्यावतीने ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेऊन मरगल झटकून पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करण्यासाठी संबोधित केले जात आहे.याप्रसंगी शिवसेना वासांबे आढावा बैठकीत, पक्षाला विसरतो त्याला घरी बसवा,बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिकाला निवडून द्या असे आवाहन जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केले.तर जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिक आपली जागा दाखवेल.ईडी आणि पैसे देऊन आपल्या लोकांना फितूर केले.आम्ही ज्यांना मोठे करु शकतो त्यांना पाडूही शकतो असे ठणकावून सांगितले.
यावेळी खालापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापले मत मांडले.यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जिल्हा सल्लागार नविन चंद घाटवल, जिल्हा संघटीका रेखा ठाकरे, उपजिल्हा संघटक अनिता पाटील, खालापूर संपर्क प्रमुख भाई शिंदे, तालुकाप्रमुख संतोष विचारे, खोपोली शहरप्रमुख सुनिल पाटील, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील, एकनाथ पिंगळे, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, उपतालुका संघटक प्रिती कडव,वांसाबे विभागप्रमुख अजित सावंत, वडगाव विभाग प्रमुख सुनील थोरवे ,वासांबे संघटीका सद्गुणा पाटील,वासांबे पंचायत समिती प्रमुख कृष्णा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे,माजी उपसभापती गजानन मांडे,माजी सरपंच शशिकांत मुकादम, माजी सरपंच रोशन राऊत ,माजी सरपंच निलम पाटील, युवासेना अधिकारी संतोष पांगत आदीसह परिसरातील शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, युवासेना अधिकारी उपस्थित होते.
Be First to Comment