Press "Enter" to skip to content

विरले शाहूवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिर

दिपकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

चौक वावर्ले येथील कानसा वारणा फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तसेच शांतीदूत परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिपकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम पार पडले. दिपकदादा पाटील यांच्या मायभूमी विरले शाहूवाडी येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तर नागरिकांना ईं श्रम कार्डंचा लाभ मिळावा यासाठी ईं श्रम कार्डं मोफत वाटप करण्यात आले.त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.या बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

यावेळी दिपकदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मा.खासदार राजू शेट्टी, आमदार डॉ. विनयराव कोरे(सावकार),हभप ज्ञानेश्वर महाराज वाबले, रनवीर गायकवाड (डायरेक्टर केडीसी जिल्हा बॅक), सरपंच कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्याहस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला.परिसरातील नागरिकांना उपचारासाठी हाॅस्पिटलात नेण्यात अडचण येवू नये यासाठी दिपकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी रुग्णवाहिकेची सोय दिपकदादांनी करुन दिली आहे.

समाजसेवेतून जनमाणसाला दिशा देणारा समाजसेवक म्हणून दिपक दादांची सर्वंत्र ओळख आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांनी लक्षवेधून घेणारी चारचाकी वाहनांची भव्य रॅली काढली.ही रॅली दिपक पाटील यांच्या विरले गावात येताच जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थीनींनी लेझिम नृत्य करुन दिपक दादांचे स्वागत केले.

यावेळी मा.खासदार राजू शेट्टी, आमदार डॉ. विनयराव कोरे (सावकार),हभप ज्ञानेश्वर महाराज वाबले, सरपंच कृष्णा पाटील ,रनवीर गायकवाड (डायरेक्टर केडीसी बॅक)यांनी दिपकदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी अनेक मान्यवरांसह कानसा वारणा फाउंडेशनचे चौदा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच त्यांच्या विरले या मायभूमीत महाराष्ट्र भुषण थोर समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर)यांचे सुश्राव्य किर्तन झाले.यावेळी हजारो नागरिकांनी उपस्थित राहून श्रवणसुखाचा लाभ घेतला.दिपकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील 14 जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले.

दरम्यान विद्याथ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, विद्यार्थी संवाद मेळावा, पुस्तक वाचन, मोफत आरोग्य शिबिर , रक्तदान शिबिर,युवक मार्गदर्शन शिबिर आदी कार्यक्रम पार पडले.यावेळी आमदार डॉ विनय कोरे यांनी दिपकदादा पाटील यांच्या कार्याची स्तुती करुन सुप्रसिद्ध किर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समाजप्रबोधनाच्या जाहीर किर्तनरुपी कार्यक्रमामुळे नागरिकांचे प्रबोधन केले.त्याबद्दल दिपकदादा पाटील यांचे आमदार डॉ.विनय कोरे यांनी विशेष कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.