Press "Enter" to skip to content

विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांना ‘राष्ट्रीय समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

सिटी बेल • मुरबाड • समीर बामुगडे •

नेरुळ गावचे सुपुत्र व लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक/अध्यक्ष -विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने नुकतेच कुणबी समाज हा‌‌ल म्हसा येथे सन्मानित करण्यात आले.

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पहला वर्धपन दिन अधिवेशना कार्यक्रमात प्रकृती, संस्कृती, अन्नदाता आणि जलविज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यामध्ये विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नेरुळ गावचे सुपुत्र विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कार्याचा ठसा नेरूळसह देश व विदेशातही उमटवला आहे. त्यांना आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. हा राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय किर्तनकार व समाजप्रबोधनकार ह.भ.प. निलेश महाराज कोरडे,यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे संस्थापक श्री. संजय सावंत, स्वतंत्र संपादक पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार,स्वतंत्र संपादक पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गौरव शेलार , स्वतंत्र संपादक पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय महिला अध्यक्षा ज्योति शेलार यावेळी उपस्थित होते. यांच्या हस्ते विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.