Press "Enter" to skip to content

400 महिलांना प्रशिक्षणाचे कार्य

स्वप्नल फॉउंडेशन तर्फे कांचन आसरकर (लब्दे ) यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

घे भरारी बहूउद्देशीय सामाजिक संस्था रायगड या संस्थेचे अध्यक्ष तथा महिला सामाजिक कार्यकर्त्या कांचन मंदार आसरकर यांच्या कार्याची दखल घेत स्वप्नल फॉउंडेशन तर्फे पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात कांचन आसरकर (लब्दे ) यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

यावेळी स्वप्नल फॉउंडेशनचे अध्यक्ष दत्ता कोहिनकर,उपाध्यक्ष रवी सावंत, सचिव अनिल भुजबळ, महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, असिस्टंट एस पी -सुनील हिरुरकर आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

सहभागी होण्यासाठी आजचं काॅल करा

कांचन आसरकर (लब्दे ) यांनी घे भरारी या संस्थेतर्फे 400 हुन अधिक महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात आले आहे . प्रशिक्षणातून अनेक लहान मोठे उद्योग प्रशिक्षणार्थिंनी सुरु केले आहेत. घे भरारी या संस्थेतर्फे महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारी सर्व माहिती दिली जाते. सरकारच्या योजना, कर्ज याविषयी माहिती दिली जाते. या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन अनेक महिलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात लघु उद्योग सुरु केला आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. ही संस्था कांचन आसरकर चालवीतात.

कांचन आसरकर यांनी आदित्य प्रॉडक्शन या नावाने व्यवसायही सुरु केला आहे. विविध प्रकारचे मसाले, विविध प्रकारचे लाडू, पीठ, चॉकलेट व इतर खाद्य पदार्थ आदित्य प्रॉडक्शनच्या माध्यमातून तयार केले जातात.

कांचन आसरकर यांनी हे सर्व कार्य उत्तमपणे सांभाळत असल्याने त्यांचा कार्याचा सत्कार पुरस्कार देऊन करण्यात आला.महिला दिना निमित्त उरण मध्येही उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था यांच्या मार्फत सत्कारमूर्ती म्हणून कांचन आसरकर यांना सामाजिक कार्यकर्त्या गौरी देशपांडे यांनी ट्रॉफी देऊन गौरविले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.