सिटी बेल • रामकृष्ण पाटील • नंदुरबार •
नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार येथे “जागतिक महिला दिन” कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हा ग्राहक आयोगाच्या सदस्य मा. श्रीमती भारती केतकर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात महिला सक्षमीकरण हे केवळ ज्या दिवशी महिला आपल्या अधिकार विषयी जागृत होतील, आपल्या अधिकाराविषयी बोलतील, आपले स्वतःचे मत मांडतील त्या वेळेस होईल असे नमूद केले. त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक बाबींच्या उल्लेख करताना अनेक उदाहरणे दिली. नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक मा. डॉ. एम. एस. रघुवंशी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात जगात महिलांचे स्थान किती व कोणत्या ठिकाणी आहे याचा उहापोह केला. त्यांनी असेही नमूद केलं की आज महिलांचे स्थान सर्व व्यवसायांमध्ये पुरुषांबरोबर समान आहे.

विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी.चौधरी सर यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी पुरुषांनी नैतिकता जोपासली तेव्हाच महिला सक्षमीकरण होईल असे मत मांडले. जागतिक महिला दिनाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आशा आर. तिवारी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यामागील उद्दिष्टे स्पष्ट केले. कार्यक्रमात विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार व महिला व बाल विकास मंडळ, नंदुरबार यांच्या वतीने विविध ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती त्यांना देखील प्रशस्ती पत्रक देण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयांच्या विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. आशा आर. तिवारी व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. किरण मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.








Be First to Comment