सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •
कोलाड येथील ईशा गार्डन को.ऑप.हाऊसिंग सोसायटी मधील रहिवासी व मुळगाव सायगाव श्रीवर्धन येथील असणारे प्रभाकर पांडुरंग आंबेकर यांचे दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते.
ते धाटाव येथील निरलॉन कंपनीत कामाला होते.या कंपनीतुन निवृत्त झाल्यानंतर ते कोलाड येथेच वास्तव्याला होते. ते कुणबी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच कोलाड येथील सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय होते. ते परोपकारी व शांत स्वभावाने सर्वाना परिचित होते.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.२५/२/२०२२ तर उत्तरकार्य विधी रविवार दि.२७/२/२०२२ रोजी त्याच्या मुंबई-गोवा हायवे वरील ईशा गार्डन को. ऑप.हाऊसिंग सोसायटी डी. विंग रूम नं.१०१ येथे होणार असून त्याच्या पश्चात त्यांची पत्नी,एक मुलगा तीन मुली व मोठा आंबेकर परिवार आहे.








Be First to Comment